मेळघाटच्या जंगला वनाधिकारी-शिका-यांमध्ये गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:47 IST2017-08-18T22:47:55+5:302017-08-18T22:47:55+5:30
वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी मेळघाटच्या अतींसरक्षित जंगलात शिरलेल्या शिकारी व वनकर्मचाºयांवर गोळीबार केल्याची घटना सिपना वन्यजीव विभागात शुक्रवारी ३ वाजताच्या सुमारास रायपूर वन परिक्षेत्रात घडली.

मेळघाटच्या जंगला वनाधिकारी-शिका-यांमध्ये गोळीबार
परतवाडा (अमरावती), दि. 18 - वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी मेळघाटच्या अतींसरक्षित जंगलात शिरलेल्या शिकारी व वनकर्मचाºयांवर गोळीबार केल्याची घटना सिपना वन्यजीव विभागात शुक्रवारी ३ वाजताच्या सुमारास रायपूर वन परिक्षेत्रात घडली. प्रतिउत्तरादाखल वनकर्मचाºयांनी देखील गोळीबार केला. कुणीही जखमी झाले नसले तरी वनकर्मचाºयांना एका शिका-या अटक करण्यात यश आले आहे.
सोनू रंगू युवने (५५, रा. जोगली, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या शिका-याचे नाव आहे. त्यांच्या उर्वरित नऊ साथीदारांनी पलायन केल. त्यांचा शोध वनकर्मचारी घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, रानगव्याची शिकार करण्यासाठी दहा शिकारी पाच बंदूका , भाले व शिकारीचे साहित्य घेऊन जंगलात शिरल्याची माहिती वनकर्मचा-यांणा मिळाली. त्याआधारे सिपना वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक सुनील शर्मा, सहा. वनसंरक्षं बी.आर. भगत, आरएफओ सोनवले, सोळंके, वनपाल काळे, ठाकरे, सेमलकर, वनकर्मचारी एसटीपीसीचे कमांडो असा मोठा ताफा शिका-यांना पकडण्यासाठी तयार करण्यात आला.
सुरुवातीला शिका-यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, याचे उत्तर देताना त्यांन पाच राऊड फायर केले. प्रतिउत्तरादाखल वनकर्मचा-यांनी देखील गोळीबार केला. गोळीबार सुरू असल्याचा आधार घेत दहा पैकी नऊ शिकारी आपले साहित्य टाकून पलायन करण्यात यशस्वी ठरले. यातील एका शिका-यास अटक करण्यात आली.
आतापर्यंतच्या शिकार प्रकरणात प्रथमच एखादा आरोपी अटकेत आला आहे. आरोपीला शनिवारी अचलपूर येथील हजर करण्यात येणार आहे. या आरोपीकडून अनेक गोष्टींची माहिती मिळविता येईल असा वनकर्मचा-यांचा अंदाज आहे.
वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी आलेल्या शिकाºयांंनी वन कर्मचा-यावर गोळीबार केला असून एकास अटक केली आहे, घटनास्थळावरून पाच बंदूकांसह भाले व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
- बी.आर. भगत सहाय्यक वनसंरक्षक परतवाडा