शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या जंगलात हवेत गोळीबार, एक कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 18:03 IST

सागवान तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या वनकर्मचा-यांवर दगडफेक करण्यात आली. यात एक वनकर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

परतवाडा : सागवान तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या वनकर्मचा-यांवर दगडफेक करण्यात आली. यात एक वनकर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. प्रत्युत्तरात वनकर्मचा-यांनी हवेत गोळीबार केला. यानंतर वनतस्करांनी पळ काढला. चिखलदरा तालुक्यातील पूर्व मेळघाट वनविभागाच्या अंजनगाव वनपरिक्षेत्रातील खिरकुंड परिक्षेत्रात सदर प्रकार घडला. वनपरिक्षेत्र अधिकारी ओमप्रकाश पेंदोर, वनकर्मचारी सुरत्ने, सुशांत काळे आदी सागवान तस्करांच्या पाळतीवर होते. तस्करांनी अगदी जवळून सागवान चरपटा वनकर्मचाºयांच्या दिशेने फेकल्या व दगडफेक केली. यात सुरत्ने यांच्या पायाला दगड लागल्याने ते जखमी झाले. दगडफेक रोखण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. यानंतर तस्करांनी पलायन केले. १९ होते तस्कर, माल जप्तखिरकुंडच्या कम्पार्टमेंट क्रमांक १०६४ मध्ये सावरपाणी परिसरात १९ तस्कर होते. प्रत्येकाजवळ एक सागवान चरपट होती. त्या सर्व सोडून पळ काढल्याने वनविभागाने तो माल जप्त केला आहे. अंजनगाव, भंडारजला जाते सागवान-अंजनगाव तालुक्याला लागून चिखलदरा तालुक्यातील वनक्षेत्र आहे. सावरपाणी परिसरातील सागवान तस्कर मोठ्या प्रमाणात वृक्षकटाई करून भंडारज येथील महेंद्र दिप्टे याच्याकडे अंजगाव येथे विक्री करीत असल्याचे झालेल्या कारवाईत उघडकीस आले आहे. या कारवाया वनविभागाऐवजी अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने केल्या होत्या. त्यानंतर वनविभागाची झोप उघडली होती. अंजनगाव परिक्षेत्रातील सागवानची परतवाडा परिक्षेत्रांतर्गत विक्री केली जात असताना सीमारेषेने वनाधिकाºयांना बंधने घातल्याचे सत्य आहे. खिरकुंड परिसरात बुधवारी सायंकाळी सागवान तस्करांनी दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल हवेत एक राऊंड फैरी झाडण्यात आल्या. सागवान चरपटा जप्त करण्यात आल्या आहेत.ओमप्रकाश पेंदोर, वनपरिक्षेत्र अधिकारी, अंजनगाव सुर्जी

टॅग्स :AmravatiअमरावतीMelghatमेळघाट