फ्रेजरपुरा परिसरात गुडांकडून फायरिंंग?
By Admin | Updated: October 26, 2014 22:33 IST2014-10-26T22:33:22+5:302014-10-26T22:33:22+5:30
यशोदानगर परिसरातील काही गुडंप्रवृत्तीच्या युवकांनी गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर फ्रेजरपुरा परिसरात देशी कट्ट्यातून फायरिंग केल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

फ्रेजरपुरा परिसरात गुडांकडून फायरिंंग?
अमरावती : यशोदानगर परिसरातील काही गुडंप्रवृत्तीच्या युवकांनी गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर फ्रेजरपुरा परिसरात देशी कट्ट्यातून फायरिंग केल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी मात्र या घटनेबाबत कानावर हात ठेवले आहेत.
फ्रेजरपुरा परिसरात एका कुख्यात गुंडाचे निवासस्थान आहे. त्या गुंडाला पोलिसांनी तडीपार केले आहे. तरीही त्याचा वावर परिसरात आहे. या गुंडाकडून फ्रेजरपुरा परिसरात अवैध धंदे सुरु आहेत. याच अनुशंगाने हा गुंड परिसरात फेरफटकाही मारतो व यातूनच दहशत कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांपूर्वी फ्रेजरपुरा व यशोदानगर या परीसरातील दोन गुंडांमध्ये वाद झाला होता.
यशोदानगरातील गुंड आपल्या काही साथिदारांच्या हाती देशी कट्टा देऊन फ्रेजरपुरा परिसरात दुसऱ्या गटावर चालून गेला. या टोळीने देशी कट्टयातून फायरींग सुध्दा केली. मात्र, सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. ही चर्चा फ्रेजरपुरा व यशोदानगर परिसरात आहे. दोन दिवसांपासून या परिसरात ‘फायरींग’ची चर्चा आहे. मात्र पोलीस प्रशासन या घटनेबाबत अनभिज्ञ आहे. पोलीस प्रशासनाकडून अद्यापर्यंत साधी चौकशीही करण्यात आली नाही, हे विशेष. या घटनेच्या चर्चेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.