परसापुरात आग; दोन दुकाने जळाली
By Admin | Updated: April 7, 2017 00:19 IST2017-04-07T00:19:41+5:302017-04-07T00:19:41+5:30
गावातील बसस्टँडजवळ असलेल्या दुकानांना बुधवारला रात्री १२.३० ते १ वाजतादरम्यान अचानक आग लागल्यामुळे दोन दुकाने जळून खाक झाली.

परसापुरात आग; दोन दुकाने जळाली
परसापूर : गावातील बसस्टँडजवळ असलेल्या दुकानांना बुधवारला रात्री १२.३० ते १ वाजतादरम्यान अचानक आग लागल्यामुळे दोन दुकाने जळून खाक झाली.
रात्री साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान गावातील नागरिक संतोष खोजरे घरी जात असताना त्यांना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच धावपळ सुरू करून गावातील नागरिकांना जमा केले आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामुळे उर्वरीत ८-१० दुकानांना वाचविण्यात यश आले.
सदर घटनेत दादाराव जुमळे यांचे सलून पूर्णत: जळून खाक झाले. सोबत रफीक पठाण यांचे दोन कॅरम सेट व दुकान जळून खाक झाले. सोबतच ईश्वरसिंग डोंगरे यांच्या दुकानातील सर्व सामान आगीत जळाले. या घटनेची माहिती पोलीस पाटील महेंद्र खणवे यांनी पोलिसांना व अग्निशमन दलाला कळवली होती. मात्र अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्याअगोदरच गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. (प्रतिनिधी)