मसानगंज येथे टायरच्या दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST2021-05-06T04:13:38+5:302021-05-06T04:13:38+5:30

अमरावती : मसानगंज परिसरातील जुन्या व रिमोल्डच्या टायर दुकानाला आग लागली. यात लाखो रुपयांचे टायर जळून खाक झाले. ही ...

Fire at a tire shop at Masanganj | मसानगंज येथे टायरच्या दुकानाला आग

मसानगंज येथे टायरच्या दुकानाला आग

अमरावती : मसानगंज परिसरातील जुन्या व रिमोल्डच्या टायर दुकानाला आग लागली. यात लाखो रुपयांचे टायर जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या चार बंबच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. रात्री घटना घडल्यामुळे मनुष्यहानी टळली.

पोलीसूत्रानुसार, फिर्यादी प्रफुल्ल कैलास अहेरवार (३०, रा. मसानगंज) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. सदर आग अज्ञात इसमाने लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक इसम कैद झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना व अग्निशमन दलाच्या पथकाला देण्यात आले. त्यानुसार अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविणे सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Fire at a tire shop at Masanganj