जमील कॉलनीत घराला आग, लक्षावधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST2021-09-04T04:17:34+5:302021-09-04T04:17:34+5:30

फोटो पी ०३ आग अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमील कॉलनी येथील शेख मकसूद यांच्या राहत्या घरी ...

Fire in Jamil Colony, loss of millions | जमील कॉलनीत घराला आग, लक्षावधींचे नुकसान

जमील कॉलनीत घराला आग, लक्षावधींचे नुकसान

फोटो पी ०३ आग

अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमील कॉलनी येथील शेख मकसूद यांच्या राहत्या घरी आग लागली. या घटनेत लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी २.१५ च्या सुमारास ही आग लागली. घराच्या आतील चार गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात आल्याने मोठे नुकसान टळले. सोन्याचे दागिने बाहेर काढण्यात आले. मात्र, घरातील फर्निचर, एसी, मॉड्युलर किचन, फॅन, बेड असे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.

आगीची माहिती मिळताच ट्रान्सपोर्ट नगर उपकेंद्र व मुख्यालयातील बंब घटनास्थळी रवाना झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अख्खे घर आगीत जळून खाक झाले होते. अग्निशमन विभागचे अधीक्षक अजय पंधरे, सैय्यद अनवर, शोहेब खान, राजू शेंडे, फायरमन. काकडे, मकवाणे, .मुजाहिद, उताणे, चौधरी, हिवराळे, शारीक खान, फाईक खान, हर्षद दहातोंडे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. नागपुरी गेट पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Fire in Jamil Colony, loss of millions