शिरपूर गावानजीकच्या पहाडाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST2021-04-05T04:11:36+5:302021-04-05T04:11:36+5:30
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिरपूर येथील पारधी बेड्यानजीकच्या पहाडाकडील ई-क्लास जमिनीवरील गवत पेटले. ही आग पाहता-पाहता गावानजीक २०-२५ फुटांवर ...

शिरपूर गावानजीकच्या पहाडाला आग
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिरपूर येथील पारधी बेड्यानजीकच्या पहाडाकडील ई-क्लास जमिनीवरील गवत पेटले. ही आग पाहता-पाहता गावानजीक २०-२५ फुटांवर वस्तीपर्यंत येऊन पोहोचली. या ठिकाणी सुमारे शंभर घरांची वस्ती आहे. गावकऱ्यांची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली व अनर्थ टाळला.
शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. चांदुर रेल्वे येथून अग्निशमन दलाचे वाहन आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी सरपंच निवृत्ती केशरखाने, तलाठी शीतल राठोड, ग्रामसेविका एल.व्ही. लोंधे, पोलीस पाटील दिनेश पवार, ग्रामपंचायत सदस्य आरवंती भोसले, लक्ष्मी राऊत, दिवाकर माकोडे, किरण सरदार, अनिल शेगोकार व गावकरी मंडळी घटनास्थळी दाखल झाली होती.