गाडेगाव येथे आगीत लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:20+5:302021-03-07T04:12:20+5:30
वरूड : तालुक्यातील गाडेगाव येथे सोनार यांचे शेतातील घराला रात्रीच्या वेळी अचानक लागलेल्या आगीत कापूस, तूर, शेती अवजारे, ...

गाडेगाव येथे आगीत लाखोंचे नुकसान
वरूड : तालुक्यातील गाडेगाव येथे सोनार यांचे शेतातील घराला रात्रीच्या वेळी अचानक लागलेल्या आगीत कापूस, तूर, शेती अवजारे, स्प्रिंकलर पाईप आदी जाळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वरूड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
गाडेगावलगत गावठाणात जीवन सोनारे यांची शेती असून, ते शेतात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सर्व कृषिमालसुद्धा ते शेतात ठेवतात. ३ मार्च रोजी रात्री ११ वाजता अचानक या साहित्याला आग लागली. धान्य, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. वरुड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. महसूल यंत्रणा आणि पोलिसांनी पंचनामा केला. सोनारे यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.