आमला विश्वेश्वर येथे गोठ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:13 IST2021-04-13T04:13:14+5:302021-04-13T04:13:14+5:30

साठवून ठेवलेले कुटार जळून खाक, बैलांना ही आस चांदूर रेल्वे (अमरावती) : श्री संत एकनाथ महाराज मंदिरामागील पंढरीवर (गुरांचे ...

Fire to the cowshed at Amla Vishweshwar | आमला विश्वेश्वर येथे गोठ्याला आग

आमला विश्वेश्वर येथे गोठ्याला आग

साठवून ठेवलेले कुटार जळून खाक, बैलांना ही आस

चांदूर रेल्वे (अमरावती) : श्री संत एकनाथ महाराज मंदिरामागील पंढरीवर (गुरांचे कडबा-कुटार) सोमवार दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात सुरेश बाखडे यांचे ८ बंडी कुटार, गोपाळ दामोदर रुईकर यांचे दोन बंडी इंधन तसेच ४ बंडी कुटार व विनोद बाभूळकर यांचे ६ बंडी कुटार गवत ६ बंडी, ३ बैल आगीत होरपळल्याने गंभीर जखमी झाले.

प्रतापसिह बघेल यांचे १५ बंडी कुटार आणि प्रकाश पाचपोर यांचे ६ बंडी कुटार जळून खाक झाले. घटनेची पाहणी करण्यासाठी पंचायत समिती उपसभापती प्रतिभा डांगे, सरपंच प्रदीप कुबडे, पोलीस पाटील शाम चर्जन पोहचले. सौरभ डोंगरे यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. आग विझविण्यास ग्रामस्थांनीही मदत केली. कुऱ्हा पोलीस ठाण्याचे आठवले व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले होते.

Web Title: Fire to the cowshed at Amla Vishweshwar