शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारात आग; ८० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 8:35 PM

चांदूर बाजारातील ब्राह्मणवाडा थडी मार्गावरील तीन संत्रा मंड्यांना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता शॉर्ट सर्किटने आग लागली. या भीषण आगीत ८० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे तीन संत्रा मंडी जाळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: चांदूर बाजारातील ब्राह्मणवाडा थडी मार्गावरील तीन संत्रा मंड्यांना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता शॉर्ट सर्किटने आग लागली. या भीषण आगीत ८० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.संत्र्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून चांदूर बाजाराची ओळख आहे. शहरातील ब्राह्मणवाडा थडी मार्गावर हंगामात दरवर्षी सात ते आठ संत्रा मंड्या उभारण्यात येतात. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ब्राह्मणवाडा थडी मार्गावरील अब्दुल सलीम शेख फरीद यांची एक, तर अतीक अहमद सईद अहमद यांच्या दोन संत्रा मड्यांना आग लागली. यामध्ये अ. सलिम शेख फरीद यांच्या मंडीतील ३० लाखांचे १५ हजार प्लास्टिक कॅरेट, तीन लाखांचे टीनशेड व २० हजारांच्या वजन काट्याचे आगीत नुकसान झाले.अतीक अहमद यांच्या दोन मंड्यांमध्ये संत्रा बहर संपुष्टात आल्याने मोठ्या प्रमाणात टरबुजाचा साठा करण्यात आला होता. आगीत २२ लाखांचे ११ हजार प्लास्टिक कॅरेट, १२ लाखांची वॅक्सिंग मशीन, आठ लाखांचे टीनशेड तसेच दीड लाखांचे टरबूज जाळून आगीत पूर्णत: खाक झाले. ही आग शॉर्ट सर्कीटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग विझवण्याकरिता चांदूर बाजार येथील अग्निशमन दल, एच.जी. इन्फ्रा कंत्राटदार कंपनीचे दोन टँकरसह अचलपूर येथील अग्निशमन वाहनाने दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.संत्रा मंडीला आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेला दिल्यानंतरही चांदूरबाजार नगरपालिकेचे अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी अर्धा तास उशिरा पोहोचली. त्यातच ही अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली तेव्हा अर्धी रिकामीच होती.नगरपालिकेचे दुर्लक्षस्थानिक अग्निशामन दलाचे वाहन लीक असल्याने यामध्ये पाणी साठवून ठेवणे अशक्य असल्याची खंत वाहनचालक एजाज अली यांनी सांगितले. वाहन दुरुस्तीबाबत पालिका प्रशासनाला अनेकदा लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तरीही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यावेळी घटनास्थळी तहसीलदार उमेश खोडके, तलाठी भारत पर्वतकर, मंडळ अधिकारी गजेंद्र मानकरसह शिरजगाव बंड ग्रामपंचायतचे सरपंच मानपुरे उपस्थित होते.

टॅग्स :fireआग