सिलिंडर स्फोटातील आगीत घर जळून खाक

By Admin | Updated: September 22, 2015 00:28 IST2015-09-22T00:28:41+5:302015-09-22T00:28:41+5:30

महालक्ष्मीच्या पुजेच्या तयारी दरम्यान झालेल्या सिलींडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग लागली.

A fire broke out in a cylinder blaze | सिलिंडर स्फोटातील आगीत घर जळून खाक

सिलिंडर स्फोटातील आगीत घर जळून खाक

दोन जखमी : मुदलीयार नगरातील घटना
अमरावती : महालक्ष्मीच्या पुजेच्या तयारी दरम्यान झालेल्या सिलींडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग लागली. यामध्ये दोन जण जखमी झाली असून मामूरकर कुटुबींयांचे घर जळून खाक झाले. ही घटना रविवारी रात्री मुदलीयार नगरात घडली. शंकर मामुरकर व त्यांचा पुतण्या मनोज पुंडलिंक मामुरकर असे जखमींचे नावे आहेत.
रविवारी दुपारी मामुरकर यांच्या घरातील हॉलमध्ये महालक्ष्मी पूजनांची तयारी सुरु होती. त्याचवेळी स्वयपांक खोलीत महाप्रसादाची तयारी सुरु होती. मात्र, अचानक स्वयपांक घरातील गॅस सिलिंडरची गळती होऊन आग लागली. यामुळे काही वेळातच सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये स्वयंपाकाच्या साहित्यासह कपाट, फ्रिज, पंखा आदींची राख रांगोळी झाली. दागिन्यांसर रोखरक्कमही नाहीशी झाली. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. याचवेळी शंकर मामूरकर व त्यांचा पुतण्या मनोजने घरातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो दोंघेही जखमी झालेत. काही वेळात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगिवर नियंत्रण मिळविले. त्यांच्या कुटुंबात महालक्ष्मी पूजा उत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, यंदा सिलिंडर स्फोटामुळे महालक्ष्मी स्थापनेला गालबोच लागल्याची चर्चा कुटुबीयांमध्ये सुरु होती. या आगित मामुरकर यांच्या घरातील लाखों रुपयांचे घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे.

Web Title: A fire broke out in a cylinder blaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.