पथ्रोट येथील गोठ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:32+5:302021-04-10T04:12:32+5:30
फोटो पी ०८ पथ्रोट पथ्रोट : गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास वाॅर्ड नं.३ कलालपुऱ्यातील गजानन वानरे यांच्या गोठ्याला अचानक ...

पथ्रोट येथील गोठ्याला आग
फोटो पी ०८ पथ्रोट
पथ्रोट : गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास वाॅर्ड नं.३ कलालपुऱ्यातील गजानन वानरे यांच्या गोठ्याला अचानक लाग लागली. गोठ्यात झोपलेल्या आदिवासी कुटुंबाला नागरिकांनी जागी केल्यामुळे अनर्थ टळला. मात्र आगीच्या विळख्यात सापडलेल्या गोठ्यात बांधलेल्या कालवडीचा जळून मृत्यू झाला.
आग लागल्याची माहिती रुपेश पुरकुंडे यांनी पोलिसांना दिली. ठाणेदार सचिन जाधव यांनी परतवाडा व अंजनगाव सुर्जीच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. कलालपुऱ्यातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. आगीचे कारण समजू शकले नाही. पथ्रोट येथे दोन महिन्यांपूर्वी येथील तेलंगखडी वाॅर्ड क्र.२ मध्ये देखील आग लागली होती.