पाळा शेतशिवारात धुऱ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:16 IST2021-04-30T04:16:18+5:302021-04-30T04:16:18+5:30

मोर्शी : नजीकच्या पाळा शेतशिवारात महादेव मसाने व मधुकर वाडीकर यांचे शेत असून गुरुवारी सकाळी १० ...

Fire in the backyard | पाळा शेतशिवारात धुऱ्याला आग

पाळा शेतशिवारात धुऱ्याला आग

मोर्शी : नजीकच्या पाळा शेतशिवारात महादेव मसाने व मधुकर वाडीकर यांचे शेत असून गुरुवारी सकाळी १० ते ११ वाजता दरम्यान जोरदार हवा आल्याने वीज प्रवाहाच्या घर्षणातून पडलेल्या ठिणगीमुळे शेताच्या धुऱ्याला आग लागली. यात हिरवे बांबू जळाले. दोन ते तीन संत्र्याची झाडेसुद्धा जळाली. मोर्शी येथील अग्निशमन विभागाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. पाळा येथे वायरमन नंदकिशोर उमक व अनिस खान यांनी वीजपुरवठा खंडित केला. यावेळी पाळा ग्रामपंचायतीचे सरपंच अजय राऊत, उपसरपंच चंपत नेवारे, ग्रामपंचायत सदस्य राजेश घोडकी, राजेश बिसंद्रे, नरेंद्र सोनागोते, पोलीस पाटील सागर साठे, साहेबराव गायकी यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले.

---------------------

Web Title: Fire in the backyard