खासगी रुग्णालयांच्या संचालकांना फायर ऑडिट निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:59+5:302021-01-22T04:12:59+5:30

(फोटो आहे) अमरावती : खासगी रुग्णालयांच्या संचालकांनी आपापल्या रुग्णालयांचे फायर ऑडिट तातडीने करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी ...

Fire audit instructions to directors of private hospitals | खासगी रुग्णालयांच्या संचालकांना फायर ऑडिट निर्देश

खासगी रुग्णालयांच्या संचालकांना फायर ऑडिट निर्देश

Next

(फोटो आहे)

अमरावती : खासगी रुग्णालयांच्या संचालकांनी आपापल्या रुग्णालयांचे फायर ऑडिट तातडीने करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले आहे. त्यासंदर्भात रुग्णालयांच्या संचालकांची पोलीस आयुक्त कार्यालयात गुरुवारी बैठक घेण्यात आली.

यावेळी पोलीस आयुक्तांनी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी संवाद साधला. त्यात रुग्णालयांचे अग्निशमन ना हरकत प्रमाणप्रत्र तसेच विद्युत पुरवठ्याबाबत चालणारी साधने याबाबतसुद्धा त्यांनी आढावा घेतला. चर्चे दरम्यान ज्या- ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट झालेले नाही. त्यासंदर्भाचे संचालकांजवळ तसे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. अशांना त्यांच्या रुग्णालयात उपलब्ध उपकरणांची तपासणी करून त्याला अद्ययावत करण्याबाबत तसेच विद्युतशी संबंधित उपकरणांची वेळोवेळी तपासणी करून त्याची काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. रुग्णालय परिसरात योग्य ती पार्किंग व्यवस्था करून घेण्याबाबतसुद्धा सूचना दिल्या. यावेळी रुग्णालयांच्या संचालकांच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. भविष्यात भंडाराच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासंदर्भाची तयारी करण्याचेही पोलीस आयुक्त म्हणाल्या. यावेळी परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) विक्रम साळी व खासगी रुग्णालयांच्या संचालकांची उपस्थिती होती.

Web Title: Fire audit instructions to directors of private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.