महामार्गावर धावत्या वाहनांचा वेग वाढविल्याचा दंड ७ लाखांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:16 IST2021-09-09T04:16:58+5:302021-09-09T04:16:58+5:30
असाईनमेनट ४ अमरावती : शहरासोबतच महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकांकडून दंड वसूल केला जातो. महामार्ग पोलीस व वाहतूक ...

महामार्गावर धावत्या वाहनांचा वेग वाढविल्याचा दंड ७ लाखांचा
असाईनमेनट ४
अमरावती : शहरासोबतच महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकांकडून दंड वसूल केला जातो. महामार्ग पोलीस व वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून तो दंड आकारला जातो. अमरावती शहर वाहतूक पोलिसांकडून जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत वेगाने वाहने हाकणाऱ्या तब्बल ७ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वेगाने वाहन चालविणाऱ्या व वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलीस एक हजार रुपयांचा दंड आकारतात.
///////////////
भरधाव वेगाने वाहन चालविल्याची महिनानिहाय प्रकरणे
महिना : केसेस जानेवारी : १०७९
फेब्रुवारी : ७७८
मार्च: १०८४
एप्रिल : ९४२
मे: १०४३
जून १११०
जुुलै : ९५६
एकूण : ६९९२
/////////////
धावत्या वाहनाचा मोजला जातो वेग
ओव्हरस्पीड धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलीस व वाहतूक पोलिसांना स्पीडगन देण्यात आली आहे. चारचाकी वाहनांसाठी ७४ किलोमीटर प्रतितास, तर दुचाकी, ट्रक आणि एसटीबसला ६३ किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा ठरवून दिलेली आहे. स्पीडगनने हा वेग मोजला जातो.
////////////////
एसएमएसवर मिळते पावती
महामार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून दंड वसूल करणे शक्य नाही. त्यामुळे स्पीडगनने कारवाई केल्यानंतर दंडाच्या रकमेची पावती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते. त्यास वाहनचालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
////////////