होम आयसोलेशनमधील दोन संक्रमित रुग्णांना ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST2021-05-19T05:00:00+5:302021-05-19T05:00:54+5:30

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार होम आयसोलेशनमध्ये नियमभंग करणाऱ्या रुग्णांवर कलम १८८ अन्वये तसेच साथरोग प्रसार नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच त्यांना गृह विलगीकरणामधून काढून संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल. दंडात्मक रक्कम न भरल्यास ती मालमत्ता करामध्ये जोडली जाणार असल्याचे या विभागाचे प्रमुख सचिन बोंद्रे यांनी सांगितले.

A fine of Rs 50,000 for two infected patients in home isolation | होम आयसोलेशनमधील दोन संक्रमित रुग्णांना ५० हजारांचा दंड

होम आयसोलेशनमधील दोन संक्रमित रुग्णांना ५० हजारांचा दंड

ठळक मुद्देआतापर्यंत १२ रुग्णांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : होम आयसोलेशनमधील संक्रमित रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे नरेडीनगर  व कंवरनगर भागातील दोन रुग्णांना २५ हजार रुपये दंडाच्या नोटीस बजावण्यात आल्या. महापालिकेच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी केली. या रुग्णांनी त्यांच्या घरावर लावलेले फलक काढले होते. पथकाद्वारे तात्काळ तपासणी करून फलक पुनर्स्थापित करण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार होम आयसोलेशनमध्ये नियमभंग करणाऱ्या रुग्णांवर कलम १८८ अन्वये तसेच साथरोग प्रसार नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच त्यांना गृह विलगीकरणामधून काढून संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल. दंडात्मक रक्कम न भरल्यास ती मालमत्ता करामध्ये जोडली जाणार असल्याचे या विभागाचे प्रमुख सचिन बोंद्रे यांनी सांगितले.
 महानगरपालिका आयुक्तांनी गृह विलगीकरणातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक व नियंत्रण कक्ष या दोन्ही यंत्रणांद्वारे गृह विलगीकरणाच्या अटी-शर्ती मोडणाऱ्या रुग्णांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सचिन बोंद्रे, नीलेश सोळुंके, शिक्षक  संचालकांनी  मंगळवारी ही कारवाई केली.

आतापर्यंत १२ रुग्णांवर कारवाई
महापालिका क्षेत्रात १ ऑगस्ट २०२० पासून स्वतंत्र खोली व स्वतंत्र प्रसाधनगृह असणाऱ्या असिम्प्टमॅटिक रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधा दिली जाते व या रुग्णांची नियंत्रण कक्षाद्वारे रोज दोन वेळा चौकशी केली जाते. महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत ७० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यत १६,१७७ रुग्णांनी ही सुविधा घेतलेली आहे. यामध्ये नियमांचा भंग करणाऱ्या १२ रुग्णांना प्रशासनाद्वारे प्रत्येकी २५ हजारांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. रुग्णांद्वारा दंड न भरण्यात आल्याने ही रक्कम मालमत्ता करात जोेडण्यासाठीचे प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे डाॅ सचिन बोंद्रे यांनी सांगितले.

 

Web Title: A fine of Rs 50,000 for two infected patients in home isolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.