दोन वर्षांत सव्वा कोटींचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:40+5:302021-01-08T04:36:40+5:30
विटाळा ते सुलतानपूर मार्ग, २६ हजार वाहनांवर कारवाई, महामार्ग पोलिसांची कामगिरी धामणगाव रेल्वे : देवगाव महामार्ग पोलिसांनी विटाळा ते ...

दोन वर्षांत सव्वा कोटींचा दंड वसूल
विटाळा ते सुलतानपूर मार्ग, २६ हजार वाहनांवर कारवाई, महामार्ग पोलिसांची कामगिरी
धामणगाव रेल्वे : देवगाव महामार्ग पोलिसांनी विटाळा ते सुलतानपूर या मार्गावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल २६ हजार वाहनांवर कारवाई करून दोन वर्षांत सव्वा कोटींचा दंड वसूल केला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाढणाऱ्या अपघातांना आळा बसावा, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने मदत व्हावी तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्यासाठी नागपूर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर देवगाव येथे पोलीस मदत केंद्रांची निर्मिती केली आहे. पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार दिलीप हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ पोलीस कर्मचारी व दोन चालक कार्यरत आहेत. त्यांनी दोन वर्षांत वाहन चालविण्याचा परवाना नसणे, सीट बेल्टचा वापर न करणे, अतिवेगाने वाहन चालविणे, ओव्हरलोड हेल्मेट नसणे, ब्लॅक फिल्म, पार्किंग नियमांची हेळसांड अशा २६ हजार ५३७ प्रकरणांमध्ये वाहनचालक-मालकांवर कारवाई केली. यातून पोलिसांनी दोन वर्षांत जवळपास १ कोटी २४ लाखांचा दंड वसूल केला आहे.
-------
कोट येत आहे.