‘आधार’ नोंदणीसाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध
By Admin | Updated: June 26, 2015 00:35 IST2015-06-26T00:35:30+5:302015-06-26T00:35:30+5:30
शाळांमधील बालकांचे आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी शासनामार्फत अभियान राबविण्यात आले. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नियोजन केले असून तालुकानिहाय नोंदणी केली जाणार आहे.

‘आधार’ नोंदणीसाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध
अमरावती : शाळांमधील बालकांचे आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी शासनामार्फत अभियान राबविण्यात आले. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नियोजन केले असून तालुकानिहाय नोंदणी केली जाणार आहे. यामध्ये ४ लाख ८० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी मोफत पाठ्यपुस्तके शालेय गणवेश, पोषण आहार, भविष्यात एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत.
बालकांचा प्रवेश नोंदणी क्रमांक आधार कार्डशी जोडला जाणार आहेत. यासाठी प्रत्येक बालकाचे आधारकार्डशी जोडला जाणार आहेत. यासाठी प्रत्येक बालकाचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. २७ एप्रिलपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागामार्फत २६ जूनपर्यंत म्हणजेच एकूण ६० दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)