अखेर लोंबणाऱ्या वीज तारा बदलविण्याचे काम सुरू
By Admin | Updated: June 25, 2016 00:11 IST2016-06-25T00:11:47+5:302016-06-25T00:11:47+5:30
बडनेरा शहरात ६५ वर्षांपासून असलेल्या विद्युत तारा, जुने विद्युत खांब धोक्याचे ठरत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केल्यावर वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेतली आहे.

अखेर लोंबणाऱ्या वीज तारा बदलविण्याचे काम सुरू
दखल : ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते वृत्त
बडनेरा : बडनेरा शहरात ६५ वर्षांपासून असलेल्या विद्युत तारा, जुने विद्युत खांब धोक्याचे ठरत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केल्यावर वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेतली आहे. शहरात बऱ्याच ठिकाणच्या तारा बदलविण्याचे काम सुरू केले आहे. जुने खांबदेखील लवकरच बदलविले जाणार असल्याचे समजते.
सन १९५२ मध्ये लागलेले विद्युत खांब व तारांचे जाळे बडनेरा शहरात ठिकठिकाणी धोक्याचे ठरू शकते, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. बऱ्याच विद्युत तारांना जोडण्यात आले आहे. बिड धातुचे गोल विद्युत खांबदेखील गंजलेले आहे. थोडाही वारा किंवा पाऊस आला की तारा तुटतात व बराच वेळपर्यंत शहरात विद्युत पुरवठा खंडित राहत आहे. रात्रीच्या वेळी बिघाड झाल्यास चार-चार तास विद्युत पुरवठा खंडित राहतो. वीज वितरण कंपनीने शहरात नव्याने विद्युत तारा लावण्याचे काम सुरू केले. काही भागात नवीन विद्युत तारा जोडण्यात आल्या. तसेच ज्या भागात विद्युत तारा खराब झाल्या आहेत. त्याही बदलविले जाणार आहे. गंजलेले पोलदेखील नव्याने टाकण्यात येणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता योगेश लहाने यांनी दिली. यापूर्वीदेखील बरेच गंजलेले पोल नव्याने लावण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)