अखेर ‘त्या’ ३४६ महाविद्यालयांना ताकीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:37+5:302021-03-10T04:14:37+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत गत दोन वर्षांपासून पदवी वितरण समारंभाचे आयोजन टाळणाऱ्या ३४६ महाविद्यालयांना ताकीद देण्यारे ...

Finally, warning to those 346 colleges | अखेर ‘त्या’ ३४६ महाविद्यालयांना ताकीद

अखेर ‘त्या’ ३४६ महाविद्यालयांना ताकीद

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत गत दोन वर्षांपासून पदवी वितरण समारंभाचे आयोजन टाळणाऱ्या ३४६ महाविद्यालयांना ताकीद देण्यारे पत्र पाठविले आहे. आगामी ३७ व्या पदवी समारंभाचे आयोजन न केल्यास प्रतिमहाविद्यालय १० हजारांचा दंड आकारला जाईल, असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार मान्यताप्राप्त महाविद्यालयांना पदवी वितरण समारंभाचे आयोजन अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने सन २०१८-२०१९ या वर्षात ३५ व्या पदवी वितरण समारंभ टाळणारी १६४, तर सन २०१९-२० या वर्षात ३६ वा पदवी वितरण समारंभाचे आयोजन न करणारे १७२ महाविद्यालये असे एकूण ३४६ महाविद्यालयांना मंगळवारी ताकीद पत्र पाठविले. गत आठवड्यात परीक्षा मंडळाची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यात पदवी वितरण समारंभाला पाठ फिरविणाऱ्या महाविद्यालयांना ताकीद पत्र देऊन समारंभ न घेण्याचे कारणे मागवावी, असा निर्णय घेण्यात आला. १/ २०१९ च्या एकरूप परिनियमानुसार पदवी वितरणाला पाठ दाखविणाऱ्या महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाध्यक्षांना यासंबंधी पत्र पाठविण्यात आले. अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालये संलग्न आहेत.

---------------

परीक्षा मंडळाला दंडात्मक अधिकार

पदवी वितरण समारंभाचे आयोजन न करणाऱ्या महाविद्यालयांना नियमानुसार विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाला कारवाई करता येते. मात्र, ही कारवाई निश्चित करताना उणिवा, दोष, त्रुटी आदी बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. आता ३७ वा पदवी वितरण समारंभ न घेतल्यास प्रतिमहाविद्यालय १० हजार रूपये दंड आकारला जाईल, असा परीक्षा मंडळाने निर्णय घेतला आहे.

-------------------

परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार ३७ वा पदवी वितरण समारंभ न घेणाऱ्या महाविद्यालयास १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय झाला आहे. त्याअनुषंगाने चालू शैक्षणिक सत्रात विद्यापीठ प्रशासन अशा महाविद्यालयांवर नक्कीच कारवाई करणार आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.

Web Title: Finally, warning to those 346 colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.