शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

...अखेर मंत्र्यांचे 'पीए' ठरले, कामाला मिळणार गती; १६ मंत्र्यांना अजूनही प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:04 IST

कोण कुणाचे पीए : केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राज्य मंत्रिमंडळाचे गठन झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने कामकाजास गती मिळाली असून, मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी त्यांचे स्वीय सहायक (पीए) निवडले आहेत, तर १६ मंत्र्यांना अद्यापही उत्तम 'पीए'चा शोध आहे.

मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी कामाचा धडाका सुरू केला असताना त्यांचे सहकारी मात्र आवडीतील 'पीए'च्या शोधात होते. अखेर हा शोध संपला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १७ जानेवारी रोजी मंत्र्यांसाठी 'पीए' आणि विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. शासनाच्या कार्यालयीन आस्थापनेवर असलेल्या वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना आता मंत्र्यांच्या सेवेत 'ऑन ड्युटी' तैनात करण्यात आले आहे. असे असले तरी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र वित्त विभागाच्या मान्यतेसह द्यावे लागणार आहे.

केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए राज्यमंत्री म्हणून सहा आमदारांनी शपथ घेतली. त्यातील केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए मिळाले आहे. यात पंकज भोयर, मेधना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, माधुरी मिसाळ यांचे भाग्य उजळले. योगेश कदम आणि आशिष जयस्वाल हे अद्याप पीएविना आहेत

१६ मंत्र्यांना प्रतीक्षा मंत्री संजय राठोड, नीलेशराणे, उदय सामंत, गिरीश महाजन, गुलाबराब पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, जयकुमार रावल, अतुल सावे, शंभुराज देसाई, आशिष शेलार, आदिती तटकरे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आकाश पुंडकर, प्रकाश आबिटकर या १६ मंत्र्यांना पीएचा शोथ असणार आहे.

कोण कुणाचे पीए उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे: जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे, उपमुख्यमंत्री अजित पवार: पशुधन विकास अधिकारी डॉ. अमर भडंगे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे : अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींमी, तहसीलदार प्रशांत पाटील व कक्ष अधिकारी राहुल गांगुर्डे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपायुक्त जयदीप पवार, नायब तहसीलदार डॉ. गौरी शंकर चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ : अवर सचिव नंदकुमार आंदळकर, उपमुख्य कार्यकारी भूपेंद्र बेडसे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसministerमंत्रीnagpurनागपूर