शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

अखेर 'न्यू अमरावती स्थानक' बनले भुसावळ विभागातील पहिले गुलाबी स्टेशन

By गणेश वासनिक | Updated: August 9, 2023 18:10 IST

महिला कर्मचाऱ्यांकडे ‘ए टू झेड’ व्यवस्थापन; व्यावसायिक उत्पन्न, सुरक्षा उपाय आणि गुन्हेगारी नियंत्रणावर भर

अमरवाती : मध्य रेल्वेचे 'न्यू अमरावती स्थानक' (नवी अमरावती) हे भुसावळ विभागातील पहिले गुलाबी स्थानक बनले असून ५ ऑगस्टपासून ‘ए टू झेड’ कारभाराचे व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यांच्या हाती आले आहे. महिला कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक उत्पन्न, सुरक्षा उपाय आणि गुन्हेगारी नियंत्रणावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.मध्य रेल्वे मुंबई विभाग महिला कर्मचाऱ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यात नेहमीच अग्रेसर आहे. सर्व महिला व्यवस्थापित स्थानक मुंबई विभागातील माटुंगा स्थानक आणि त्यानंतर नागपूर विभागातील अजनी स्थानक स्थापन करणारे भारतीय रेल्वेचे पहिले झोन असण्याचा मान आहे.

मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून, भुसावळ विभागातील सर्व महिला व्यवस्थापित स्थानक म्हणून न्यू अमरावती स्थानक स्थापन करण्यात आले आहे. भुसावळ विभागातील पहिले ‘पिंक स्टेशन’ आणि संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थापित केले जाणारे मध्य रेल्वेचे तिसरे स्थानक ठरले आहे. न्यू अमरावती स्थानकात चार उप स्टेशन अधीक्षक, चार पॉइंट महिला, तीन रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि एक स्टेशन तिकीट बुकिंग एजंट असे एकूण १२ महिला कर्मचारी संख्या येथे कर्तव्यावर असणार आहे. नवीन अमरावती स्टेशनवर दररोज अंदाजे ३८० प्रवाशांचे अवागमन होत असून, दररोज १० रेल्वे गाड्या येथून ये-जा करतात.

नवीन अमरावती रेल्वे स्थानक ५ ऑगस्टपासून पिंक स्टेशन घोषित करण्यात आले असून, तसा कारभार सुरू झाला आहे. या रेल्वे स्थानकाहून दोन पॅसेजर गाड्या आणि वेळापत्रकानुसार लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. मालगाड्या नियमित सुरू असतात. महिलांसोबत काम करण्याचा वेगळचा आनंद आहे.

- मंजु निषाद, प्रबंधक, नवीन अमरावती रेल्वे स्थानक

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेAmravatiअमरावती