पेरणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:01 IST2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:01:10+5:30

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ८८ हजार २७४ हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये धान ५,०६३ हेक्टर, ज्वारी १३,७३२ हेक्टर, मका ११,१६४ हेक्टर, मूग १६,०५४ हेक्टर, उडीद ४,९१७ हेक्टर व भुईमुगाची ४४० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यामध्ये २ लाख ३९ हजार २२१ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली.

In the final stages of sowing | पेरणी अंतिम टप्प्यात

पेरणी अंतिम टप्प्यात

ठळक मुद्देपावसाचा लंपडाव सुरूच : खरिपात अडीच लाख हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ लाख ४२ हजार २०० हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. ही प्रस्तावित क्षेत्राच्या ९३.२१ टक्के आहे. सोयाबीनच्या काही लॉटमध्ये उगवणशक्ती नसल्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली. त्या क्षेत्रातही आता पेरणी आटोपली आहे. यंदा सर्वाधिक २.४८ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन व २.३९ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ८८ हजार २७४ हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये धान ५,०६३ हेक्टर, ज्वारी १३,७३२ हेक्टर, मका ११,१६४ हेक्टर, मूग १६,०५४ हेक्टर, उडीद ४,९१७ हेक्टर व भुईमुगाची ४४० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यामध्ये २ लाख ३९ हजार २२१ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. यात धारणी तालुक्यात १०,०८९ हेक्टर, चिखलदरा १६२५ हेक्टर, अमरावती १५,८३४ हेक्टर, भातकुली १०,९०० हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६,८३६ हेक्टर, चांदूर रेल्वे ६,२८० हेक्टर, तिवसा १७,४५० हेक्टर, मोर्शी २९,८३५ हेक्टर, वरूड ३०,३३८ हेक्टर, दर्यापूर ३५,५३४ हेक्टर, अंजनगाव सुर्जी १६,६०० हेक्टर, अचलपूर १८,८३८ हेक्टर, चांदूर बाजार २०,५८४ व धामणगाव रेल्वे तालुक्यात १९,६७६ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत सोयाबीनची २ लाख ४८ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यात धारणी तालुक्यात ८,२०० हेक्टर, चिखलदरा ८,६५० हेक्टर, अमरावती २६,२६३ हेक्टर, भातकुली २४,७०० हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ४६,६०७ हेक्टर, चांदूर रेल्वे २५,८६६ हेक्टर, तिवसा १७,२०१ हेक्टर, मोर्शी १७,३७८ हेक्टर, वरूड ३,०२२ हेक्टर, दर्यापूर ८,९२८ हेक्टर, अंजनगाव सुर्जी १२,३०० हेक्टर, अचलपूर १०,१५८ हेक्टर, चांदूर बाजार १३,५६८ व धामणगाव रेल्वे तालुक्यात २५,८२५ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.

१० तारखेनंतर पाऊस घटणार
सौराष्ट्रावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र तथा ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे आहेत. झारखंडवरसुद्धा कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि ७.६ मिमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. गुजरात किनारपट्टी ते केरळ कमी दाबाची द्रोणीय स्थिती कायम आहे. मान्सूनची टर्फरेषा ९ जुलै रोजी हिमालयाचे पायथ्याशी सरकण्याची शक्यता असल्याने १० जुलैनंतर जिल्ह्यासह विदर्भात पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली. ९ ते १० जुलैला काही ठिकाणी विखुरत्या स्वरूपात पाऊस होईल, असे त्यांनी सांगितले.

तालुकानिहाय असे आहे क्षेत्र
जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ लाख ४२ हजार २०० हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झालेली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ३८,४२८ हेक्टर, चिखलदरा १९,९०२ हेक्टर, अमरावती ५१,४७४ हेक्टर, भातकुली ४३९३० हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६२,३६२ हेक्टर, चांदूर रेल्वे ३८,५९२ हेक्टर, तिवसा ३९३९० हेक्टर, मोर्शी ५६,८३२ हेक्टर, वरुड ४९,९४१ हेक्टर, दर्यापूर ६८,८७३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ३८,०९० हेक्टर, अचलपूर ३८,६२१ हेक्टर, चांदूर बाजार ४२,६७६ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५२,९८६ हेक्टरवर पेरणी झाली.

Web Title: In the final stages of sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती