हवाला प्रकरणाची अंतिम सुनावणी १७ सप्टेंबर रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:53+5:302021-09-09T04:17:53+5:30
अमरावती : राजापेठ पोलिसांनी दोन वाहनांतून जप्त केलेल्या ३.५० कोटी रुपयांप्रकरणी १७ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. ...

हवाला प्रकरणाची अंतिम सुनावणी १७ सप्टेंबर रोजी
अमरावती : राजापेठ पोलिसांनी दोन वाहनांतून जप्त केलेल्या ३.५० कोटी रुपयांप्रकरणी १७ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. बुधवारी ॲड. अमोल जलतारे यांनी स्थानिक न्यायालयात आयकर विभागातर्फे ‘रिटन सबमिशन’ दाखल केले. त्यावर न्यायालयाने १७ सप्टेंबर रोजी सुनावणीचे निर्देश दिले.
राजापेठ पोलिसांनी २७ जुलै रोजी दोन वाहनातून ३.५ कोटी रुपये जप्त केले होते. त्या रकमेवर अहमदाबाद येथील नीना शहा यांनी दावा केला. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्हाला आयकर विभागासमोर उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचे शहा यांच्या वकिलांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावर बुधवारी ॲड. जलतारे यांनी न्यायालयात लेखी आक्षेप नोंदविला. त्या रकमेवर दावा करणारे तपासात असहकार्य करीत आहेत. आयकर विभागासमोर यायचेदेखील ते टाळत असल्याचे नमूद करीत त्यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराचा दाखला आक्षेपात देण्यात आला. तूर्तास ती रक्कम कोषागारात पडून आहे. ती रक्कम आपली आहे, असा दावा करताना पोलिसांसमोर आपण योग्य ती कागदपत्रे दिल्याने आयकर विभागाकडे हजर राहण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे शहा यांच्यातर्फे सांगण्यात आले. जप्त केलेल्या रकमेची शहानिशा, तिचा सोर्स तपासण्याची जबाबदारी आपली असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.