सीईओंच्या प्रतीक्षेत फायली
By Admin | Updated: September 19, 2015 00:17 IST2015-09-19T00:17:16+5:302015-09-19T00:17:16+5:30
जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासनाची धुरा सोपविल्याने कामकाजात जोखीमीचे कामे करताना ...

सीईओंच्या प्रतीक्षेत फायली
जिल्हा परिषद : प्रभारी अधिकाऱ्यांसमोर अडचणींंचा डोंगर
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासनाची धुरा सोपविल्याने कामकाजात जोखीमीचे कामे करताना येणाऱ्या अडचणीचा फटका महत्वाच्या फायलींना बसत असल्यान मुळ नियुक्तीवर असलेली मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील हे म्हसुरी येथील ४५ दिवसाच्या प्रक्षिणानंतर २० सप्टेबर पर्यत रजेवर आहेत. त्यामुळे सध्या मिनीमंत्रालयातील महत्वाच्या फायली त्याच्या प्रतिषेत थंडबस्त्यात पडल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील हे मागील ६ आॅगस्ट पासून म्हसुरी येथे ४५ दिवसांच्या प्रशिक्षणावर गेले होते. त्यांचा ६ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाचा कालावधी संपला आहे. त्यानंतर ते २० सप्टेंबरपर्यंत रजेवर असल्याने त्याचा कार्यभार विभागीय आयुक्त कार्यायातील आस्थापना विभागाचे उपायुक्त सुनील लांडगे यांच्याकडे अतिरिक्त सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मुख्य जबाबदारीसह जिल्हा परिषदेचे कामकाज सांभाळावे लागत आहे. अशातच वरिष्ठ पातळीवरून दररोज घेण्यात येणाऱ्या बैठका आणि विविध विषयांवर होणाऱ्या व्हीडीओ कॉन्सफस आणि अन्य कामांचा ताण वाढत आहे. याच कामकाजात व दौऱ्यात अधिक वेळ जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कामकाजा संबंधित महत्त्वाच्या फायली लांबणीवर पडत आहेत. विशेष म्हणजे लांडगे यांच्याकडे केवळ काही दिवसापर्यतच विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजुरकर यांनी अतिरिक्त पदभार सोपविला असल्याने जिल्हा परिषदेतील पदाधिकारील सदस्य व विभागा प्रमुख यांच्या कडून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे येणाऱ्या महत्वाच्या फायली पैकी काही फायली जोखमीच्या असल्याने याला हात न लावलेलाच बरा अशी अवस्था जिल्हा परिषदेतील जेही प्रभारी अधिकारी आहेत. त्याची झाली आहे. त्यामुळे ज्याची मुख्य जबाबदारी आहे. त्यानीच अशा फायलीचा निपटारा केला बरा अशा मानसिकतेत बरेच अधिकारी आहेत. त्यामुळे जोखीमीची कामे करण्यापेक्षा सरळ व कमी जोखमीची कामे केलीतर बरे अशा मनस्थितीत जिल्हा परिषदेचा कार्यभार सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे. यासर्व भानगडीत पदाधिकारी व विविध विभागाच्या फायली लांबणीवर पडत असल्याने मिनीमंत्रालयाचे सर्व शिल्लेदार हतबल झाले आहेत. त्यामुळे सिईओ सुनिल पाटील हे केव्हा रूजू होतात आपल्या फायली मार्गी लागतात याचीच प्रतिक्षा सर्वाना लागली आहे. त्यामुळे सध्या सिईओ सुनिल पाटील यांच्या प्रतिक्षेत फायली अशी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
पाटील सोमवारी रूजू होणार
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांचे प्रशिक्षण व सुटीचा कालीवधी २० सप्टेंबर रोजी संपत असल्याने ते सोमवारी रूजू होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत असलेल्या महत्त्वाच्या व अन्य पेंडिंग फायलींचा निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.