देवगडचा हापूस अंबानगरीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:59 IST2018-04-21T21:59:22+5:302018-04-21T21:59:51+5:30
फळांचा राजा असलेला कोकणातील देवगडचा चविष्ट हापूस आंबा अंबानगरीत दाखल झाला असून, श्याम चौकातील एका खासगी व्यापाऱ्यांनी तो विक्रीसाठी आणला आहे. एक डझनसाठी चक्क १४०० रुपये मोजावे लागत आहेत.

देवगडचा हापूस अंबानगरीत दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फळांचा राजा असलेला कोकणातील देवगडचा चविष्ट हापूस आंबा अंबानगरीत दाखल झाला असून, श्याम चौकातील एका खासगी व्यापाऱ्यांनी तो विक्रीसाठी आणला आहे. एक डझनसाठी चक्क १४०० रुपये मोजावे लागत आहेत.
अंबानगरी ही जरी फळांची बाजारपेठ असली तरी फळे व भाजीपाला बाजारपेठेत अद्याप हापूस आंब्याची आवक नोंदविली गेली नाही. हा आंबा महागडा असल्याने ठरावीक व्यापारीच याला विक्रीसाठी आणत असल्याची माहिती आहे. मात्र, फळे बाजारात लालपट्टी, बेगनपल्ली या प्रकारातील आंबे दाखल झाले आहेत. मात्र, श्याम चौकातील एका व्यापाऱ्यांकडे देवगावचा हापूस विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा आंबा मुंबईवरून त्याला विशिष्ट प्रकारचा ग्रेड टाकून तो अमरावतीला पाठविला जात असल्याची माहिती आहे.
एप्रिलमध्येच आंब्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे फळांचा हा राजा सामान्य नागरिकांच्या आवक्याबाहेरचा झाला आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागविण्यासाठी हापूसऐवजी इतर आंब्यांना नागरिकांकडून पसंती आली आहे. मात्र, चोखंदळ ग्राहक याच आंब्याला पसंती दर्शवितात.