अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST2021-03-01T04:15:38+5:302021-03-01T04:15:38+5:30
जुगारावर धाड, तिघे ताब्यात अमरावती - येथील रंगोली डेकोरेशनच्या मागे खुल्या जागेत सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून तिघांना ताब्यात ...

अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याने गुन्हा दाखल
जुगारावर धाड, तिघे ताब्यात
अमरावती - येथील रंगोली डेकोरेशनच्या मागे खुल्या जागेत सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी सुनील लक्ष्मणराव तसरे (५२) बबलू नानाजी तसरे (३६), बबन नथ्थुजी तसरे (५५, सर्व रा. अशोकनगर)विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
------------------
विनापरवाना देशी दारूची विक्री
बडनेरा - येथील राम मेघे कॉलेज चौकात विनापरवाना देशी दारूची विक्री करताना आढळून आल्याने बडनेरा पोलिसांनी पंडित रामाजी हजारे (६०, रा. नवी वस्ती) याच्याजवळून १८० मिलीच्या १३ नग देशी दारूच्या बाटल्या जप्त करून गुन्हा नोंदविला. दुसऱ्या कारवाईत ६५० रुपयांची दारू अकोला वाय पॉइंटवरूनजप्त केली. याप्रकरणी विजय किसन कुकरेजा (३२), निखिल भास्करराव भखाले (२२) विरुद्ध गुन्हा नोंदविला.