वीजचोराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:14 IST2021-04-01T04:14:21+5:302021-04-01T04:14:21+5:30

--------- सैन्यातील जवानाविरुद्ध अपघाताचा गुन्हा अमरावती : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी येथे पेट्रोल पंपानजीक एमएच ३० एक्स ६०४२ ...

Filed a case against a power thief | वीजचोराविरुद्ध गुन्हा दाखल

वीजचोराविरुद्ध गुन्हा दाखल

---------

सैन्यातील जवानाविरुद्ध अपघाताचा गुन्हा

अमरावती : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी येथे पेट्रोल पंपानजीक एमएच ३० एक्स ६०४२ क्रमांकाची दुचाकी २४ मार्च रोजी स्लिप झाली होती. यात सैन्यातील जवान श्रीकांत तुळशीराम भागवत (रा. लोणसना, ता. मूर्तिजापूर) हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात दगावले. अपघातात पत्नीदेखील जखमी झाली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी भादंविचे कलम ३०४ (अ), २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

---------

तडीपार आरोपीला अटक

अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मयूर राजेश चाळीसगावकर (२६, रा. वल्लभनगर नं. २) या तडीपार युवकाला ३० मार्च रोजी अटक करण्यात आली. तो पोलिसांना घरीच आढळून आला. त्याने परिसरातील एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरी धडक दिली. मपोका कलम १४२ अन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Filed a case against a power thief