वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:13 IST2021-01-23T04:13:29+5:302021-01-23T04:13:29+5:30
पान २ चे सेकंड लिड अंजनगाव सुर्जी : महावितरणचे सहायक अभियंता संदीप गुजर व अन्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून शासकीय ...

वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल
पान २ चे सेकंड लिड
अंजनगाव सुर्जी : महावितरणचे सहायक अभियंता संदीप गुजर व अन्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी इरफान शाह यासीन शाह (रा. इस्लामनगर) यांच्याविरूद्ध भादंविचे कलम ३५३, ३२३, ५९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
२१ जानेवारी रोजी कमरूनबी यासिन शाह यांच्या मौखिक तक्रारीवरून सहाय्यक अभियंता संदीप गुजर, प्रधान तंत्रज्ञ अरविंद नांदूरकर, नीलेश बर्वे, जयेश सयेतवाल हे इस्लामनगर येथे मीटर तपासणी करण्याकरिता गेले असता, मीटरमध्ये थेट खांबावरून वीजपुरवठा घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. कामरूनबी यासीन शाह यांची पंचनाम्यावर स्वाक्षरी घेतली. यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मुलगा इरफान शाह यासीन शाह आला व त्याने कर्मचारी जयेश सयेतवाल यांच्याशी वाद घातला. शिवीगाळ करून मारण्याकरिता हातोडा आणला असता, गुजर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु इरफान शाह याने कर्मचारी अरविंद नांदूरकर, नीलेश बर्वे, अभियंता संदीप गुजर यांना जखमी केले.
-------