शिवकुमारविरुद्ध अन्य गुन्हेही दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:13 IST2021-03-27T04:13:52+5:302021-03-27T04:13:52+5:30

परतवाडा : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःला गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली. याविषयी ...

File other cases against Shivkumar as well | शिवकुमारविरुद्ध अन्य गुन्हेही दाखल करा

शिवकुमारविरुद्ध अन्य गुन्हेही दाखल करा

परतवाडा : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःला गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली. याविषयी सुसाईड नोटमध्ये त्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव लिहिले आहे. यात त्यांना आर्थिक व मानसिक त्रास झाल्याचे म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी व अन्य गुन्हेही दाखल करण्याची मागणी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.

महिला अधिकाऱ्याला अशाप्रकारे त्रास देणे, त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेत बोलणे हादेखील गुन्हा ठरतो. याची गंभीरतेने दखल घेऊन अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. डीएफओ शिवकुमार याच्याविरुद्ध भादंविचे ३०६ कलमांतर्गत कारवाई झालेली आहे. परंतु आमची मागणी वारंवार त्रास देत असल्यामुळे ३५४ (ए) व ३७६ (सी) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी संगीता ठाकरे यांनी केली.

Web Title: File other cases against Shivkumar as well