अमीर खानविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: November 26, 2015 00:07 IST2015-11-26T00:07:54+5:302015-11-26T00:07:54+5:30
अभिनेता अमीर खान याने एका टीव्ही शोमध्ये भारतात अराजकता व सामाजिक तेढ निर्माण करणारे भाष्य केल्याचा आरोप करुन अमीरविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ....

अमीर खानविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा
अमरावती : अभिनेता अमीर खान याने एका टीव्ही शोमध्ये भारतात अराजकता व सामाजिक तेढ निर्माण करणारे भाष्य केल्याचा आरोप करुन अमीरविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार हिंदू हुंकार संघटनेने बुधवारी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली.
मागणीच्या समर्थनार्थ, राजकीय व्यक्तीवर टिका करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीत प्राप्त झाले असले तरी वारंवार देशाचा अवमान होईल, असे भाष्य करणे हा राष्ट्रद्रोहच होय, असाही तर्क देण्यात आला आहे. दहशतवादी संघटना समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य करु शकते, असा इशारा आयबीने दिला असल्याचा हवाला देऊन अमिर खानचे भाष्य त्या दहशदवादी कृत्याचीच सुरुवात तर नव्हे ना, अशी शंका तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. अमीर खानची त्या अनुषंगाने चौकशी करण्याचीही मागणी सुधीर बोपुलकर यांनी तक्रारीतून केली आहे. या प्रकरणात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊ, त्यानंतर पुढील चौकशी सुरू करु, असे ठाणेदार दिलीप पाटील यांनी सांगितले.