बडनेऱ्यात महापालिका पथकाशी हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:47+5:30

कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने चिल्लर व ठोक विक्रीबाबत भाजी व फळविक्रेत्यांना मनाई केली आहे. मनपा प्रशासनाच्या गस्ती पथकाने अनेकदा ध्वनिप्रक्षेपकाद्वारे सूचना दिल्यानंतरही हातगाड्या लावल्या जातात. गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या गस्ती पथकाला कुरेशीनगरात गर्दी निदर्शनास आली. त्याठिकाणी भाजीपाल्याच्या तीन हातगाड्या दिसून आल्या. त्यांच्याकडे महापालिकेची परवानगी नव्हती.

Fighting with municipal team in Badnera | बडनेऱ्यात महापालिका पथकाशी हुज्जत

बडनेऱ्यात महापालिका पथकाशी हुज्जत

ठळक मुद्देकुरेशीनगरातील घटना : भाजीबाजार भरविला; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : येथील कुरेशीनगरात महापालिकेचे गस्ती पथक संचारबंदीत भरविलेला भाजीबाजार उलथवून जप्तीची कारवाई करीत असताना त्यांच्याशी विक्रेत्यांनी हुज्जत घातली. यावेळी विरोध करणाऱ्यांनी मोठा समूह केला होता. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाले आहेत.
मोहम्मद जावेद मोहम्मद रफीक (४८), फिरोज खान बब्बू खान (३५), अब्दुल मजीद अब्दुल रजाक (६५, तिघेही रा. बडनेरा) असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने चिल्लर व ठोक विक्रीबाबत भाजी व फळविक्रेत्यांना मनाई केली आहे. मनपा प्रशासनाच्या गस्ती पथकाने अनेकदा ध्वनिप्रक्षेपकाद्वारे सूचना दिल्यानंतरही हातगाड्या लावल्या जातात. गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या गस्ती पथकाला कुरेशीनगरात गर्दी निदर्शनास आली. त्याठिकाणी भाजीपाल्याच्या तीन हातगाड्या दिसून आल्या. त्यांच्याकडे महापालिकेची परवानगी नव्हती. तोंडाला मास्क बांधले नव्हते. यामुळे तीनही हातगाड्या जप्त करण्याची कारवाई सुरू असताना या विक्रेत्यांनी समूह करून पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली. हातगाड्या घेऊन जाण्यास विरोध केला. या घटनेत महापालिका झोन ४ चे सहायक क्षेत्रीय अधिकारी राजेश मनोहरपंत चिंचमलातपुरे याच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी तिघांविरुद्ध भादंविचे १८६, १८८, २६९, २७१ सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

बडनेऱ्यात संचारबंदीचे सातत्याने उल्लंघन
बडनेऱ्यात कोरोना संसर्गाचे दोन रुग्ण आहेत. कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाच्या विनंतीनंतरही काही लोक संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत. शासकीय कामकाजात येथे सारखा अडथळा केला जात आहे. जुनीवस्तीत दोनदा पोलिसांवर हात उगारला गेला. शिवीगाळ करण्याचे प्रकार झाले आहेत.

मनपाकडून तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. प्रशासनाला सहकार्य करा, असे सर्वांना आवाहन करतो.
- पंजाब वंजारी
पोलीस निरीक्षक, बडनेरा

कुरेशीनगरात गर्दी दृष्टीस पडली. संचारबंदीचे येथे पूर्णत: उल्लंघन केले होते. मनपाचे गस्ती पथक तेथे गेले असता, हातगाडीवर भाजी विकणाऱ्यांनी हुज्जत घातली.
- राजेश चिंचमलातपुरे
सहायक क्षेत्रीय अधिकारी

Web Title: Fighting with municipal team in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार