शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘द काश्मीर फाइल्स’वरून परतवाड्यात दोन गटात राडा; १५ जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 18:35 IST

पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणांना अटक केली असून, काहींचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देयुवकांची नारेबाजी, हाणामारीपरतवाड्यात तणाव

परतवाडा (अमरावती) : अचलपूर शहरातील चित्रपटगृहातून ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बघून आल्यावर परतवाडा शहरातील लाल पूल भागात ‘जय श्रीराम’चे नारे लागले. यानंतर दोन गटात नारेबाजी व हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री १२:३० च्या सुमारास घडली. पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणांना अटक केली असून, काहींचा शोध सुरू आहे.

पोलीस सूत्रानुसार, रविवारी रात्री अचलपूर येथील चित्रपटगृहातून ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बघून आल्यावर लाल पूलनजीक आझादनगर भागात काही युवकांनी ‘जय श्रीराम’ची नारेबाजी केली. त्यांच्या घोषणा ऐकून आझादनगर येथील काही मुस्लिम युवकसुद्धा बाहेर आले. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. या गदारोळात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली.

दरम्यान त्याठिकाणी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम, पोलीस जमादार राजेश पटेल व अश्लोक दहीकर, चालक सदांनद साबळे व विठ्ठल मुंडे, पोलीस अंमलदार मंगेश श्रीराव यांच्या पथकाने त्यांना पांगविले. विभागीय गस्तीवर ठाणेदार संतोष ताले व इतर कर्मचारी होते. पोलीस जमादार दीपक राऊत यांच्या फिर्यादीवरून तत्काळ दखल घेत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. जिल्ह्यात अगोदरच कलम ३७ (१) (३) मपोका लागू आहे, हे विशेष.

दोन्ही गटातील युवकांना केली अटक

पोलिसांनी दोन्ही गटातील १५ युवकांना अटक केली. त्यामध्ये प्रज्वल शंकर अंभोरे (१९), अमित शंकर अंभोरे (२०), गौरव गजानन शहारे (२०), अतिश रामचंद्र कोतरे (२२), लखन संतोष सोयाम (२९), लखन राजेंद्र इंगळे (२५), नीलेश देवचंद कोतरे (३२), नंदू दिलीप सरकटे (२६), अर्जुन शंकरराव निखाडे (३३), विक्की विष्णू अंभोरे (२४), शेख तन्वीर ऊर्फ तन्नू शेख अजिज (२६), मोहम्मद समीर मोहम्मद अयुब (२०), शेख शाकीर शेख रशीद (२३), गणेश श्याम उईके (१९) व आकाश किशोर इंगळे (३०, सर्व रा. आझादनगर, लाल पूल) यांचा समावेश आहे. १० ते १२ मुस्लिम युवक त्या परिसरातील मिश्र वस्तीतून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्सamravati-acअमरावतीArrestअटकPoliceपोलिस