शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमा रंगात येण्यापूर्वीच टॉकीजमध्ये ढिशूम ढिशूम! लाईव्ह फायटिंगने प्रेक्षकांचं मनोरंजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 15:50 IST

सिनेमा रंगात येण्यापूर्वीच शहरातील श्याम टॉकीजमध्ये जागेच्या वादातून मारहाण झाली. यात सिनेमा मध्येच थांबवावा लागला आणि पोलिसांना बोलवावे लागले. परतवाड्यात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

ठळक मुद्देपरतवाड्यातील घटना, प्रसारण थांबविले, पोलिसांना पाचारण

अमरावती : चित्रपटगृहात सिनेमा पाहणं प्रत्येकालाच आवडतं, त्यातही आवडती सीट मिळाली तर आनंद द्विगुणित होऊन जातो. पण, कधी-कधी जागेवरुन वादही उद्भवतात. असाच काहीसा किस्सा परतवाड्यात घडला आहे. जागेच्या वादावरून झालेली बाचाबाची क्षणात मारहाणीत बदलली आणि लोकांना सिनेमात होते तशी फायटिंगचा आनंद डोळ्यादेखत अनुभवायला मिळाला.  

सिनेमा रंगात येण्यापूर्वीच शहरातील श्याम टॉकीजमध्ये जागेच्या वादातून मारहाण झाली. यात सिनेमा मध्येच थांबवावा लागला आणि पोलिसांना बोलवावे लागले. परतवाड्यात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

टॉकीज प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. अल्लू अर्जुन अभिनित चित्रपटाचा हा पहिलाच दिवस. पहिल्याच दिवशी सिनेमा हाऊसफुल्ल. रात्रीच्या खेळाला मद्यपी अवतरले. अंधारात ते आपल्या जागेपर्यंत पोहोचले. पण, त्यांना त्यांच्या जागेवर दुसरे प्रेक्षक बसल्याचे दिसले. त्या जागेसाठी त्यांनी हट्ट धरला. थोडी बाचाबाची झाली आणि त्या अंधारातच मारहाणीला प्रारंभ झाला. पडद्यावर येऊ घातलेल्या मारहाणीपूर्वी प्रेक्षकांना ही लाईव्ह फाईट बघायला मिळाली. टॉकीजमधील अंधारात या लाईव्ह फायटिंगचा प्रेक्षकांनी चांगलाच आस्वाद घेतला.

टॉकीजमधला गोंधळ लक्षात येताच व्यवस्थापकांनी सिनेमा थांबवला आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांचा शोध घेतला, पण ते त्यापूर्वीच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. नंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTheatreनाटकcinemaसिनेमा