ब्रिटिश सरकारविरूध्द उभारला होता लढा : राज्यात यांच्या नावाने एकही योजना नाही
By Admin | Updated: November 15, 2015 00:08 IST2015-11-15T00:08:43+5:302015-11-15T00:08:43+5:30
आपल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात आदिवासीत स्वदेशी व भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून ब्रिटिश सरकारविरूध्द लढा ...

ब्रिटिश सरकारविरूध्द उभारला होता लढा : राज्यात यांच्या नावाने एकही योजना नाही
ब्रिटिश सरकारविरूध्द उभारला होता लढा : राज्यात यांच्या नावाने एकही योजना नाही
मोहन राऊ त ल्ल अमरावती
आपल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात आदिवासीत स्वदेशी व भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून ब्रिटिश सरकारविरूध्द लढा उभारणाऱ्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एकही योजना नाही. आदिवासींच्या जननायकाला कधी न्याय मिळणार, असा सवाल १५ नोव्हेंबर या त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील आदिवासींनी सरकारला विचारला आहे़
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते़ उद्या रविवारला त्यांची जयंती संपूर्ण देशात आदिवासी बांधव साजरी करतात़ बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांचीजवळील लिहतू या आदिवासी गावात झाला. ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यास सुरूवात झाली, तेव्हा त्यांनी इंग्रजाविरूध्द मोठा लढा उभारला होता़ सन १८९४ मध्ये बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी उपासमारी व महागाईने अनेक लोक मृत पावलीत. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची नि:स्वार्थी अंत:करणाने सेवा केली़ ब्रिटिश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करून दुष्काळावर मात करण्याकरिता त्यांनी जनआंदोलन केले होते़ त्यावेळी बिरसामुंडा यांना दोन वर्षांचा कारावास झाला होता़