धामणगाव तालुक्यात पंधरा हजार ग्रामस्थांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:13 IST2021-04-28T04:13:34+5:302021-04-28T04:13:34+5:30
धामणगाव रेल्वे : कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा तालुक्यात झाला असून, आतापर्यंत ...

धामणगाव तालुक्यात पंधरा हजार ग्रामस्थांना लसीकरण
धामणगाव रेल्वे : कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा तालुक्यात झाला असून, आतापर्यंत १५ हजार शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी आधार कार्ड तपासल्यानंतर टोकन क्रमांक दिला जातो.
धामणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात दररोज सकाळी लसीकरण करण्यात येते. कोविशिल्ड लस शहरात देण्यात येते. ग्रामीण भागात कोव्हॅक्सिन लस दिली जाते. तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, निंबोली, अंजनसिंगी, तळेगाव दशासर या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांतही लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत ४५ वर्षांवरील वयाच्या शहरातील ५५००, तर ग्रामीण भागात नऊ हजार महिला-पुरुषांनी लसीकरण करून घेतले. यात कोरोनायोद्ध्यांना पहिला व दुसरा डोज देण्यात आला. जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती सुरेश निमकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन दगडकर यांनी मंगळवारी दुसरा डोस टोचून घेतला. सर्वांना ही लस मिळावी, यासाठी तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे हे दररोज नियोजन करीत आहेत.
कॅप्शन : सभापती सुरेश निमकर व माजी उपसभापती नितीन दगडकर लस घेताना.