ममदापूर येथे भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:12 IST2021-04-25T04:12:48+5:302021-04-25T04:12:48+5:30
लोकवस्तीतही शिरकाव फोटो पी २४ तिवसा तिवसा : तालुक्यातील ममदापूर येथे शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास नजीकच्या जंगलाला ...

ममदापूर येथे भीषण आग
लोकवस्तीतही शिरकाव
फोटो पी २४ तिवसा
तिवसा : तालुक्यातील ममदापूर येथे शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास नजीकच्या जंगलाला भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करीत लोकवस्तीत शिरकाव केला. मात्र, वेळीच चांदूर रेल्वे येथील अग्निशमन दलाचे जवान पोहचल्याने ही आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अज्ञाताने गावाशेजारील जंगलाला आग लावली. यात मोठ्या प्रमाणावर जंगलसुद्धा जळून खाक झाले. ममदापूर येथील सरपंच मुकुंद पुनसे यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले. लोकवस्तीत आग पसरल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. तिवसाचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी दखल घेऊन चांदूर रेल्वे येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.