पोलीस दलात बदलीचे वारे क्रीम ठाण्यासाठी अनेकांची फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST2021-07-08T04:11:02+5:302021-07-08T04:11:02+5:30
अमरावती : एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस कॉन्सटेबल ते एएसआयपर्यंतच्या बदल्या एरवी एप्रिल, मे महिन्यात करण्यात ...

पोलीस दलात बदलीचे वारे क्रीम ठाण्यासाठी अनेकांची फिल्डिंग
अमरावती : एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस कॉन्सटेबल ते एएसआयपर्यंतच्या बदल्या एरवी एप्रिल, मे महिन्यात करण्यात येतात. परंतु यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर बदल्या ३० जूनपर्यंत थांबविण्यात आल्या होत्या. जिल्हाअंतर्गत बदल्यांचे आदेश जरी झाले नसले तरी पोलीस दलात मात्र, बदल्यांचे वारे वाहू लागल्याची विभागात चर्चा आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महत्त्वाचे क्रीम ठाणे मिळण्यासाठी अनेकांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे.
पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालयांतर्गत येणाऱ्या पोलीस शिपाई ते पोलीस उपअधीक्षकांपर्यंत एकूण २,४७८ पदे आहेत. सार्वत्रिक बदल्या २०२१ साठी ५९० कर्मचारी पात्र ठरले आहेत. मात्र, पीएसआय ते पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस महासंचालक करतात. डीवायएसपी पातळीवरील बदल्या गृहविभागाकडून केली जाते. मात्र, जिल्हा अंतर्गत पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पातळीवर बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक काढतात. मात्र, आता बदल्यांचे वारे वाहू लागल्यामुळे आपल्याला क्रीम ठाणे मिळावे यासाठी काहींनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती आहे. बदल्यांसाठी पोलीस शिपाई ते एएसआयमध्ये बदलीस पात्र ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक ४१, पोलीस हवालदार १३३, पोलीस नाईक १४९, पोलीस शिपाई १४९, महिला कर्मचारी ९३ यांचा समावेश आहे.
पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या
५९०
पदनाम हजर पदे बदलीस पात्र
१) पोलीस उपअधिक्षक ५ ३
२)पोलीस निरीक्षक २४ ३
३) एपीआय ७० ८
४) पीएसआय ९७ ११
५)एएसआय २२४ ४१
६) पोलीस हवालदार ३६० १३३
७) पोलीस नाईक ५२२ १४९
८) महिला कर्मचारी ४२८ ९३
बॉक्स
या तीन ठाण्यांना पसंती
जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा, परतवाडा पोलीस ठाणे, अचलपूर, वरूड ठाणे अशा क्रीम ठाण्यात जाण्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. मोठ्या तालुक्यात शिक्षणाच्या व राहण्याची चांगली सुविधा असल्याने पसंती अधिक आहे.
बॉक्स
या ठाण्यात नको रे बाबा
जिल्ह्यातील खोलापूर, रहिमापूर चिंचोली, मंगरूळ चव्हाळा, धारणी अशा ठिकाणी पोलीस कर्मचारी जाण्यास उत्सुक नाही. या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने व राहण्याच्या दृष्टीने सुविधासुद्धा नाही. ही ठाणे क्रीम मानली जात नसल्यामुळे पोलीस कर्मचारी तेथे जाण्यास टाळतात.