शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

खरिपाच्या तोंडावर खतांचा दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:13 IST

अमरावती : दोन आठवड्यांवर आलेल्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आलेली. चार वर्षांपासून सलग ...

अमरावती : दोन आठवड्यांवर आलेल्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आलेली. चार वर्षांपासून सलग नापिकी, नैसर्गिक आपत्ती यामुळे उत्पादन खर्चही पदरी पडलेला नाही. आता पुन्हा उत्पादन खर्चात वाढ होणार असल्याने हमीभावात वाढ केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

वास्तविकता मागच्या हंगामापासून सुरू असलेला कोरोना संकट काळ सध्याही सुरूच आहे. त्यात लॉकडाऊन यासोबतच बियाणे, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या. डिझेल दरवाढीने टॅक्टरद्वारे मशागतीचा खर्च वाढला. या सर्व विपरीत परिस्थितीत उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व शेतीचे नियोजन करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

यंदाच्या खरीप हंगामापासून रासायनिक खतांची ५०० ते ७०० रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आलेली आहे. युरिया वगळता अन्य कुठल्याही खतांच्या किमतीवर केंद्र शासनाचे नियंत्रण नाही. खरिपात मोठी मागणी असलेल्या डीएपीच्या किमती कमी करण्यासाठी राज्य शासनाद्वारा केंद्राला विनंती केल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अमरावती जिल्हा दौऱ्यात सांगितले. मात्र, अद्याप किमती कमी करण्यात आलेल्या नाहीत. खत निर्मितीसाठी आवश्यक सल्त्युरिक, फॉस्परिक ॲसिडच्या किमतीत वाढ झालेली आहे. चीनसह अन्य देशातून होणारी कच्च्या मालाची निर्यात सध्या बंद असल्याने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे खते मंत्रालयाच्या हवाल्याने कृषी विभागाने सांगितले.

दरम्यान जिल्ह्यांध्येही खतांच्या दरवाढीवरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. याशिवाय महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांद्वारा शासनाला निवेदन पाठविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील संचारबंदी उठताच या दरवाढीविरोधात चांगलेच रान पेटण्याचे संकेत आहेत.

बॉक्स

खरिपासाठी १,८,८९० मे.टन खतांची मागणी

यंदाच्या खरीप हंगामासाठी १,०८,८९० मे.टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यामध्ये २९,४४० मे.टन युरीया, डीएपी २४,३९० मे.टन, एमओपी ७,२६० मे.टन, संयुक्त खते २४,३०० मे.टन, एसएसपी २३,५०० मे.टन खतांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७,६३५ मे.टन खतांची विक्री झालेली असल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ३०,५९७ मे.टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे.

बॉक्स

२३,६९० मे.टन खतांची जुन्याच भावाने विक्री अनिवार्य

जिल्ह्यात सद्यस्थितीत मागिल वर्षीचा २३,८९० मे.टन खतांचा साठा शिल्लक आहे. हा साठा जुन्याच भावाने विकावा लागणार आहे. यामध्ये युरिया ४,८७२, डिएपी ४,०३३ मे.टन, संयुक्त खत ७,३६९ मे.टन, एसएएसपी ५,४७७ मे.टन, अमोनियम सल्फेट ३१४ मे.टन, एमओपी १,१२८ मे.टन व मिश्रखते ४९७ मे.टन खतांचा साठा शिल्लक असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी यु.आर,आगरकर यांनी सांगितले.

बॉक्स

जुन्या खतांच्या विक्रीवर भरारी पथकांचा वॉच

विक्रेत्यांकडील जुन्या खतांची विक्री जुन्याच दराने करण्याचे विक्रेत्यांना अनिवार्य केले आहे. ही विक्री पॉस मशीनद्वारे करावी लागणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. वाढीव भावाने विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्या विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. या विक्रीकर जिल्ह्यातील १६ भरारी पथकांची नजर राहणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे यांनी सांगितले.