भरधाव ट्रेलर हॉटेलमध्ये घुसला, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 03:13 IST2016-10-29T00:10:01+5:302016-10-29T03:13:56+5:30

स्थानिक बस स्टँडवर भरधाव ट्रेलर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये शिरल्याने...

The ferryman entered the trailer hotel, killing one | भरधाव ट्रेलर हॉटेलमध्ये घुसला, एक ठार

भरधाव ट्रेलर हॉटेलमध्ये घुसला, एक ठार

हॉटेलचा चुराडा : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील घटना, एक गंभीर 
तळेगाव दशासर : स्थानिक बस स्टँडवर भरधाव ट्रेलर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये शिरल्याने झालेल्या भयंकर अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात हॉटेलसह शेजारच्या जि.प. हायस्कूलची संरक्षण भिंत देखील उद्धवस्त झाली. ही घटना २८ आॅक्टोबर रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान घडली. प्रेमसिंग शिवलाल चंदनखेडे (४०,रा.वैजापूर, जि. औरंगाबाद) असे मृताचे तर प्रकाश मर्मट असे गंभीर जखमीचे नाव आहे.
या अपघातात प्रकाशने दोन्ही पाय गमावले असून त्याला उपचारार्थ यवतमाळ येथील रूग्णालयात दाखल केले आहे. विस्तृत माहितीनुसार, नागपूरकडून औरंगाबादकडे लोखंड घेऊन जाणारे ट्रेलर तळेगाव बसस्थानकावरील गतिरोधकावरून उसळून महालक्ष्मी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या नव्या कोऱ्या वाहनावर धडकले आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये शिरले. या अपघातात जि.प. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची ५० फुट लांबीची भिंत देखील कोसळली व हॉटेलचा चुराडा झाला. बाजूलाच असलेल्या सुलोचना तुळसकर व सतीश बुल्ले यांच्या गॅरेजचेसुद्धा लाखो रूपयांचे नुकसान झाले.
घटनेच्यावेळी बसस्थानकावरील अपघातग्रस्त हॉटेलमध्ये लातूर येथून कांदा भरून निघालेला ट्रक क्र. एम.एच.२०-डी.ई.८०६२ चा चालक प्रेमसिंग चंदनखेडे हा चहा पिण्यास थांबला होता. या अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हॉटेल कामगार विशाल मनोहरे हा गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर ट्रेलर चालकाने पळ काढला. घटनास्थळी ठाणेदार सुरडकर व सहकारी आणि महामार्ग पीएसआय ठाकूर यांनी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी ट्रेलर चालकाविरूद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दुय्यम ठाणेदार शिवाजी राठोड करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The ferryman entered the trailer hotel, killing one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.