जिल्ह्यात चाराटंचाईचे सावट
By Admin | Updated: May 6, 2015 00:26 IST2015-05-06T00:26:32+5:302015-05-06T00:26:32+5:30
पावसाची अनियमितता आणि वैरण नियोजनाच्या अभावामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना चाराटंचाईचा ...

जिल्ह्यात चाराटंचाईचे सावट
दुष्काळ : १५ जूननंतर संकट गडद होण्याची शक्यता
अमरावती : पावसाची अनियमितता आणि वैरण नियोजनाच्या अभावामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना चाराटंचाईचा सामना आतापासूनच करावा लागत असून बाजारात ढेपेसह पशुखाद्यांचे भावही वाढल्याने दुग्ध व्यवसायामोरील संकटे वाढली आहेत. मागणीपेक्षा दुधाचा कमी पुरवठा अशी स्थिती असताना चाराटंचाईचे नवे संकट उभे ठाकले आहे.
शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पशुधनाच्या चाऱ्याची गरज दरमहा १ लाख ४ हजार मे.टन आहे. तर एकूण अपेक्षित चारा उत्पादन दरमहा ५ लाख ३० हजार मे टन आहे. मात्र नैसर्गिक संकटामुळे वैरणाचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. जिल्ह्यात मोठ वनक्षेत्र आहे. पण नैसर्गिक कुरणेही संकुचित होत चालली आहेत. या कुरणांचे व्यवस्थापन आणि विकास करणे आवश्यक असणाऱ्या त्याकडे दुर्लक्ष आहे. मुबलक चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंजनसारख्या वृक्षांची लागवड गवताच्या कुरणांचा विकास अशा उपाययोजना वनविभागाच्या सहकार्र्यान होती घेणे कृषी विभागाच्या सहकार्याने शेताच्या बांधावर चारा उत्पादक वृक्षांची लागवड करणे अशा उपाययोजना आता सूचविण्यात आल्या आहेत. यंदा पावसाच्या अनियमिततेचा फटका सोयाबीनला बसला. तूर व ज्वारीही अनेक भागात नष्ट झाली. रब्बी हंगामात अकाली पाऊ स आणि गारपीटीने पिके जमीदोस्त झाल्याने गुरांचा चारा दिसेनासा झाला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूग्ध व्यवसायाकडे वळलेल्या शेतकऱ्यांना पशुधन कुठेही करणे कठीण झाले आहे. चाराटंचाईमुळे शेतकरी कुठे गुरे खरेदी करण्यासाठी धनवान नसल्याचे चित्र विविध ठिकाणच्या बाजारपेठेत दिसून येते. सोयबाीन सारख्या पिकांच्या अवशेषाचा वापरही चारा म्हणून केला जावू शकतो. अशा चाऱ्यामधून जनावरांना पोषक खाद्यही उपलब्ध होते.
सध्या जिल्ह्यात पुरेसा चारा आहे. मात्र १५ जूनपर्यंत पाऊस न आल्यास जिल्ह्यात पशुधनाच्या चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास चाऱ्याची मागणी आली नाही.
- पी.व्ही. सोळंके,
पशुधन विकास अधिकारी