शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मरणाच्या भीतीने गिरगुटीत एकानेच घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST

०७एएमपीएच२० - आदिवासींचे प्रबोधन करताना वासंती मंगरोळे व दयाराम काळे (((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((( मेळघाटात अफवा, उर्वरित जिल्ह्यातून आले अन् लसीकरण ...

०७एएमपीएच२० - आदिवासींचे प्रबोधन करताना वासंती मंगरोळे व दयाराम काळे

((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((

मेळघाटात अफवा, उर्वरित जिल्ह्यातून आले अन् लसीकरण करून निघून गेले

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरण शिबिरात नव्वद जणांचे लसीकरण झाले. त्यापैकी गावातील एकमेव व्यक्तीने महत्प्रयासाने लस घेतली. उर्वरित ८९ नागरिक वरूड, अंजनगाव सुर्जी, परतवाडा, अचलपूर आदी भागातून येऊन लस घेऊन निघून गेले. देशभर कोरोना लसीसाठी मारामार सुरू असताना, मेळघाटात मात्र लस घेतल्याने माणसाचा मृत्यू होतो, ही अफवा मागील चार दिवसांपासून दोनशेपेक्षा अधिक गावांत पसरली. यामुळे आदिवासींनी लस टोचून घेणे बंद केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.आंबापाटी गावातील काही नागरिकांनी पसरविलेली मृत्यूची अफवा मेळघाटच्या दोनशेपेक्षा अधिक गावांत पोहोचली. यामुळे आदिवासी कोरोनाची लस घेण्यास तयार नाहीत. हा गैरसमज निघून जावा, यासाठी या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे व जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांनी गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरण शिबिर आयोजित केले. आरोग्य विभागाने त्याची तयारीही केली. मंडप टाकण्यात आला. परंतु, दोन तास झाले तरीही एकही आदिवासी लस घ्यायला तयारच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे उपस्थित अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी संवाद साधून कारण शोधले तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. लस घेतल्याने माणूस मरतो. त्यामुळे आम्ही लस घेत नसल्याचे आदिवासींनी त्यांनी सांगितले.बॉक्सअथक प्रयत्नानंतर एकानेच घेतली लस, ८९ आले तालुक्याबाहेरीलगिरगुटी गावात मंगळवारी एकूण ९० जणांनी लस घेतल्याची नोंद झाली. प्रत्यक्षात त्या गावातील एकच आदिवासीने ही लस घेतली, तर उर्वरित अचलपूर, परतवाडा, वरूड, अंजनगाव अशा तालुक्याबाहेरील लोकांनी ऑनलाईन नोंदणी करून आदिवासी पाड्यात जाऊन लस घेतली.बॉक्सजनजागृती मोहीम आवश्यकमेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात १६ हून अधिक गावे ‘हॉट स्पॉट’ ठरली आहेत. दुसरीकडे आदिवासी लस घ्यायला तयार नसल्याने आरोग्य यंत्रणेपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेमार्फत गावागावांत कोरोना लसीसंदर्भात जनजागरण मोहीम करणे गरजेचे ठरले आहे.कोटलस घेतल्याने माणूस मरतो, अशी अफवा मेळघाटात पसरली आहे. गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरणात गावातील एकमेव लाभार्थी होता.- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदराकोटगिरगुटीत गावातील नागरिकांना कोरोना लसीसंदर्भात संपूर्ण माहिती दिली. परंतु, अथक प्रयत्नानंतर केवळ एकानेच लस घेतली. प्रत्येक गावात आता जिल्हा परिषद मार्फत जनजागृती मोहीम सुरु करीत आहोत. अफवांथा थारा देऊ नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.- दयाराम काळे, समाजकल्याण सभापतीजि प अमरावती