अनंत सुपर मार्केटमध्ये एफडीएची धाड
By Admin | Updated: December 29, 2016 01:43 IST2016-12-29T01:43:28+5:302016-12-29T01:43:28+5:30
पाकिटबंद ‘सोया भेळ’मध्ये तळलेले चार ते पाच झुरळ आढळल्याचे वृत्त ‘लोकमत’ने लोकदरबारी मांडताच अन्न व औषधी

अनंत सुपर मार्केटमध्ये एफडीएची धाड
भेळीचे नमुने घेतले : संचालकाला नोटीस बजावणार
अमरावती : पाकिटबंद ‘सोया भेळ’मध्ये तळलेले चार ते पाच झुरळ आढळल्याचे वृत्त ‘लोकमत’ने लोकदरबारी मांडताच अन्न व औषधी प्रशासन खडबडून जागा झाला. बुधवारी दुपारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अनंत सुपर मार्केटमध्ये धाड टाकून तेथील सोया भेळेच्या सीलबंद पाकिटाचे नमुने जप्त केले. यासंदर्भात संचालकांना नोटीस देखील बजावली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गाडगेनगरातील रहिवासी मुकुंद बोकडे यांनी राधानगरातील अनंत सुपर मार्केटमधून ‘लाईट एन फिट’ची ‘सोया भेळ’ खरेदी केली होती. ते सीलबंद पाकिट त्यांनी घरी जाऊन उघडले असता त्यात ५ ते ६ तळलेले झुरळ आढळून आले. हा प्रकार त्यांच्या पत्नी व मुलीने अनंत सुपर मार्केटच्या संचालकाच्या लक्षात आणून दिला.