बिबट्याने केले वासरू फस्त
By Admin | Updated: July 5, 2016 00:50 IST2016-07-05T00:50:47+5:302016-07-05T00:50:47+5:30
नजीकच्या गव्हा फरकाडे येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गावात प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या

बिबट्याने केले वासरू फस्त
खळबळ : रानडुकराच्या हल्ल्यात एक जखमी
धामणगाव रेल्वे : नजीकच्या गव्हा फरकाडे येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गावात प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या वासरावर जीवघेणा हल्ला केला. यात त्या वासरू गतप्राण झाला. या घटनेमुळे गावात दहशत पसरली आहे.
प्रथमराज भामकर यांनी नेहमीप्रमाणे गोठ्यात त्यांची जनावरे बांधून ठेवली होती. रविवारी रात्री गावात बिबट्या शिरला आणि त्याने गोठ्यात प्रवेश करून वासराचा फडशा पाडला. प्रथमराज भामकर यांचे शेत गावातील मध्यवस्तीत आहे, हे विशेष. याबाबत वनविभागाला सूचना दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे, वनरक्षक ओंकार भुयार, शेख इकबाल यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांना तेथे बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आलेत. वनविभाग याविषयी अलर्ट झाला आहे. याच गावात रानडुकराच्या हल्ल्यात सोमवारी एक जण जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. सुनील कोंडे (१६) नामक गुराखी जनावरे चराईसाठी घेऊन जाताना झुडुपात लपून बसलेल्या रानडुुकराने त्याच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला आधी धामणगावला व नंतर यवतमाळ येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)