father rape upon daughter | पित्याचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पित्याचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देसंतापजनक : ग्रामीण हद्दीतील पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : ग्रामीण भागातील एका अल्पवयीन मुलीवर स्वत:च्या बापानेच घरात एकटी झोपली असल्याची संधी साधून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधम बापाविरुद्ध परतवाडा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे नोंदवून त्याला अटक केली. सदर प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे
पोलीस सूत्रांनुसार, ग्रामीण भागातील एका खेड्यात राहणाºया ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या वडिलांनी अत्याचार केला. सदर बाब आईला सांगितल्यास दोघांचे भांडण होईल, या भीतीने ती शांत राहिली.
अल्पवयीन मुलगी शाळेतील सुट्यांमध्ये घरी गेली असता, घरात एकटीच झोपली असल्याचे पाहून नराधम बापाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ती शाळेत आली. गेल्या काही दिवसांपासून सदर विद्यार्थिनी खिन्न असल्याने महिला अधीक्षक व मुख्याध्यापक यांनी तिला विश्वासात घेऊन संपूर्ण प्रकार जाणून घेतला . त्यावेळी त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली. त्यांनी सदर प्रकार तात्काळ पोलिसांना कळविला. त्यावरून ठाणेदारांनी संपूर्ण घटनाक्रम ऐकून आरोपी वडिलाविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (एन) (एबी) सहकलम ६ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.
गतवर्षी २७ आॅक्टोबर ते २१ जानेवारी २०२० दरम्यान दोन वेळा अत्याचार झाल्याचे पीडिताने तक्रारीत नमूद केले. त्यावरून पोलिसांनी सरकारी रुग्णालयात आणून पीडिताची वैद्यकीय तपासणी केली आहे.

नराधम बापास बडनेरा येथून अटक
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या फियार्दीवरून नराधम पित्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध चालविला. मजुरीच्या कामावर तो बडनेरा परिसरात असल्याची माहिती मिळताच त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकरणाने समाजमन सुन्न झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अलीकडे अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता पोलीस प्रशासन सतर्क झाले. दुसरीकडे शाळा प्रशासनाने पीडिताची आपुलकीने चौकशी केली. यात खरा प्रकार उघड झाला.

Web Title: father rape upon daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.