बिहालीनजीक अपघातात सासरा ठार, सून गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:01:41+5:30

माणिकराव दादुजी शनवारे (५५, रा. सेमाडोह ह.मु मल्हारा) असे मृताचे नाव आहे. ते सेमाडोह येथून आजारी सुनेला परतवाडा दुचाकी दवाखान्यात नेत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकीने धडक दिली. त्यात माणिकराव घटनास्थळी ठार झाले, तर सून गंभीर जखमी झाली. चारचाकी वाहनाचा चालक राजा शेळके (रा. सलोना) याने वाहन भरधाव वेगाने चालवून अपघात केल्याची माहिती आहे.

Father-in-law killed in accident near Bihali | बिहालीनजीक अपघातात सासरा ठार, सून गंभीर

बिहालीनजीक अपघातात सासरा ठार, सून गंभीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : परतवाडा-धारणी मार्गावरील घटांग ते बिहाली दरम्यान चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सासरा ठार झाला, तर सनू गंभीर जखमी झाली. सुनेवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास हा अपघात घडला.
माणिकराव दादुजी शनवारे (५५, रा. सेमाडोह ह.मु मल्हारा) असे मृताचे नाव आहे. ते सेमाडोह येथून आजारी सुनेला परतवाडा दुचाकी दवाखान्यात नेत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकीने धडक दिली. त्यात माणिकराव घटनास्थळी ठार झाले, तर सून गंभीर जखमी झाली. चारचाकी वाहनाचा चालक राजा शेळके (रा. सलोना) याने वाहन भरधाव वेगाने चालवून अपघात केल्याची माहिती आहे. जखमी सुनेच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. पुढील तपास ठाणेदार आकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
मेळघाटातील सर्व मार्ग अपघातग्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे वाचवित दुचाकीस्वारांना मार्ग काढत पुढे जावे लागते.

Web Title: Father-in-law killed in accident near Bihali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात