शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला वाचविण्यासाठी बापाकडून मुलाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 11:38 IST

बेसखेडा येथील घटना, तत्पूर्वी पोलिस ठाण्यात धाव

बेलोरा (अमरावती) : चांदूर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेसखेडा येथे आईला मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाला आवर घालताना बापाने डोक्यात हाणलेल्या विटेमुळे त्याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी जमिनीवर निपचित पडलेल्या या मुलाविरुद्ध आई-वडील पोलिस ठाण्यात तक्रार देऊन आले होते.

ऋषभ सुनील पाथरे (२८) असे मृताचे नाव आहे. सुनील भाऊसाहेब पाथरे (५८) असे आरोपी वडिलांचे नाव आहे. याबाबत ऋषभचा भाऊ निखिल याने नोंदविलेल्या फिर्यादीनुसार, व्यसनाच्या आहारी गेलेला ऋषभ हा घरी आई-वडिलांकडे पैशांची मागणी करून वारंवार वाद उकरून काढत होता.

२४ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मद्यपान करून घरी आल्यानंतर त्याने आई मंगला हिच्यासोबत वाद घातला. बेफाम झालेल्या ऋषभने विटांचे तुकडे फेकून व डोक्यात काठी घालून मंगलाला रक्तबंबाळ केले. त्याला आवर घालण्यासाठी रागाच्या भरात सुनील यांनी त्याच्या डोक्यात वीट हाणली. यामुळे तो घरापासून काही अंतर चालत जाऊन जमिनीवर कोसळला आणि निपचित पडला. तथापि, मद्याच्या अमलात असल्यामुळे तो कोसळला असावा, असा समज करून घेत सुनील व मंगला यांनी चांदूरबाजार पोलिस ठाणे गाठून ऋषभविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल केला.

यानंतर गावी स परतलेल्या पती-पत्नीने घरी न जाता मेहुण्याचे घर गाठले आणि तेथेच रात्र काढली. सकाळी घरी आले तेव्हादेखील ऋषभ निपचित पडून होता. त्याला हलविले तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार अशोक जाधव, उपनिरीक्षक वैभव चव्हाण, विनोद इंगळे, नितीन डोंगरे, राहुल गौरखेडे, अजय पाथरे, गौरव पुसदकर यांनी घटनास्थळ गाठले. पंचनाम्यानंतर आरोपी सुनीलला अटक करण्यात आली. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल नवगिरे यांनीदेखील भेट दिली. दरम्यान, गुरुवारी चांदूर बाजार पोलिसांकडून सुनीलला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती