संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एका घराला आग लागल्यानंतर पाहता-पाहत परिसरातील ३७ टिनाची घरे आगीने कवेत घेतली. मात्र, आग लागली असतानाच एका टिनाच्या निवाºयात वास्तव्याला व आजारी असलेली पपिता आग पाहताच जीव वाचविण्याकरिता ओरडाओरड करू लागली. आगीचे काही प्रमाणात चटके तिला बसले. पपिता आगीत सापडल्याची माहिती आईला कळताच जीवाची पर्वा न करता, लोकांच्या मदतीने पपिताला घरातून उचलून बाहेर आणले. त्यामुळे दुसऱ्यांदा तिला जीवदान मिळाल्याची चर्चा परिसरात होती.१२ वर्षांपूर्वी तिच्या अंगावर भिंत पडली होती. यातूनही ती सुखरुप बचावली होती. भिंत अंगावर पडल्याने तिला चांगलाच मानसिक धक्का बसला होता. तेव्हा पासून ती आजारी आहे. पपिता यांची मुलगी १२ वीत शिकत असल्याची माहिती तिची आई बेबी उगले यांनी दिली. या अग्नीतांडवात घरे जळत असताना साक्षात मृत्यू तिच्या डोळ्यासमोर उभा होता. मात्र आपली आजारी मुलगी घरात आहे. त्यादिशेने लोळ उठत असल्याचे कळताच आईने धाव घेत तिला वाचवले. पपिता यांचा विवाह पूर्वी उतखेड येथील एका व्यक्तीशी झाला होता. मात्र घरगुती वादातून पहिल्या पतीने तिला घटस्फोट दिला. काही वर्षांनी आईने तिचे दुसरे लग्न नरेश काळे यांच्याशी लावून दिले. काही वर्षे संसार सुखात चालला. कालांतराने दुसºया पतीचे निधन झाले. या संकटातून ती सावरली नाही तोच ती १६ कमान परिसरात राहत असताना तिच्या अंगावर घराची भिंत कोसळली. यातूनही त्या बचावल्या. परंतु त्या घटनेने तिला मानसिक धक्का बसला. तेव्हापासून ती आजारी राहत असल्याचे तिच्या आईने सांगितले. तेव्हा शरीरयष्टीने धस्टपुस्ट असलेल्या पपिताची प्रकृती खराब झाली. तरीही जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने तिला आगीतून बाहेर काढल्यानंतर तिच्या आईचा जीव भांड्यात पडल्यागत समाधान चेहºयावर झळकत होते. पपीताला तातडीने उपचाराची गरज आहे.
पपिताला मिळाले दुसऱ्यांदा जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:07 IST
एका घराला आग लागल्यानंतर पाहता-पाहत परिसरातील ३७ टिनाची घरे आगीने कवेत घेतली. मात्र, आग लागली असतानाच एका टिनाच्या निवाºयात वास्तव्याला व आजारी असलेली पपिता आग पाहताच जीव वाचविण्याकरिता ओरडाओरड करू लागली. आगीचे काही प्रमाणात चटके तिला बसले.
पपिताला मिळाले दुसऱ्यांदा जीवनदान
ठळक मुद्देआई धावली मदतीला