दर्यापूर मार्गावर भीषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:29 IST2018-05-15T22:29:21+5:302018-05-15T22:29:31+5:30
अमरावती मार्गावर मंगळवारी दुपारी ५ च्या सुमारास चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. यामध्ये पिता-पुत्राचा समावेश आहे.

दर्यापूर मार्गावर भीषण अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : अमरावती मार्गावर मंगळवारी दुपारी ५ च्या सुमारास चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. यामध्ये पिता-पुत्राचा समावेश आहे.
दुचाकीस्वार प्रभू रामदास इंगळे, रामदास धनुजी इंगळे आणि आणखी एक इसम असे तिघे एम.एच. २७ बीएम - २२३८ क्रमांकाच्या दुचाकीने दर्यापूर येथून माहुली धांडेकडे जात होते. दुचाकीला विरुद्ध दिशेने येत असलेल्या एमएच ३० पी ८३३८ क्रमांकाच्या भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. अपघातानंतर चालक वाहन तेथेच ठेवून घटनास्थळाहून पसार झाला. तिन्ही जखमींना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.