तिवसा तहसील कार्यालयात उपवास, धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:08+5:302021-06-03T04:10:08+5:30
तिवसा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे महत्त्वपूर्ण प्रकरण तिवसा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रकरणामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या ...

तिवसा तहसील कार्यालयात उपवास, धरणे
तिवसा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे महत्त्वपूर्ण प्रकरण तिवसा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत.
या प्रलंबित प्रकरणामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतात पेरणी करता येणार नाही. काहींनी कशी तरी पेरणी केलीच तर पिकांची आंतरमशागत करता येत नाही. नंतर पीक घरी आणताना मोठी अडचण येते. या प्रकारामुळे अनेक शेतकरी दोन वर्षांपासून तिवसा तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. लढा संघटनेने तहसीलदारांना प्रलंबित प्रकरणे धडक मोहीम आखून निकाली काढावी. अन्यथा १४ जून रोजी शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयात उपवास व धरणे आंदोलन करीत असल्याचे निवेदन दिले. यावेळी लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, योगेश लोखंडे, नीलेश राऊत, संदीप राघोर्ते, अंकुश गायकवाड, बाळा देशमुख, मंगेश ठाकूर, वैभव ठाकरे, सागर राऊत, पृथ्वी ताजी, अनूप अगले, प्रशांत राऊत उपस्थित होते.